शेळवे गावात शुक्रवार पासुन आठ दिवस जनता कर्फ्यू

शेळवे गावात शुक्रवारपासुन आठ दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला Eight days public curfew imposed in Shelve village from Friday
गावात २४ तास पोलीसांचा पहारा असणार

शेळवे,(संभाजी वाघुले) -शेळवे ता.पंढरपुर येथे ७ मे पासुन ते १५ मे पर्यंत कडक जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे,असे शेळवे ग्रामपंचायत व शेळवे ग्रामस्तरिय समितीने सांगितले आहे.

   या जनता कर्फ्यू काळात शेळवे गावात फक्त औषध दुुुकाने उघडी असतील तर दुध संस्था फक्त सकाळी व सायंकाळी दोन तासच उघडी राहतील. मात्र सर्व नियमांचे पालन करुनच यांनाही अशी सवलत दिलेली आहे. अत्यावश्यक सेवेतील किराणा व इतर सर्व व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. विनाकारण फिरणार्यावरही कडक कारवाई केली जाणार आहे.

अत्यावश्यक सेवेतीलही सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत.मागील दोन ते चार दिवसात शेळवे गावात कोरोना पाॅझिटीव्हचे प्रमाण वाढतच होते त्यामुळे कडक जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय शेळवे ग्रामपंचायत व ग्रामस्तरिय समिती शेळवे यांनी घेण्यात आल्याचे सांगितले.

   शेळवे गावाला कोरोना प्रार्दुभावापासून रोखण्यासाठी आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन, महसुल विभाग,शिक्षण विभाग,शेळवे ग्रामपंचायत व ग्रामस्तरिय समिती शेळवे अहोराञ परिश्रम घेत आहेत.

    जनता कर्फ्यूमधून शेती व शेतीशी निगडीत कामांनाही सुट दिली आहे.परंतु दररोज रोजंदारीने (खुरपण)याला बंदी घालण्यात आली आहे.

  यावेळी मन में है विश्वासचे फिल्ड आँफिसर महेंद्र देशमुख,फिल्ड आँफिसर अमोल खंडागळे, फिल्ड आँफिसर विजय भोसले ,फिल्ड आँफिसर रामकृष्ण थोरात ,फिल्ड आँफिसर ब्रम्हराज कांबळे व नामदेव गाजरे यांची या कडक जनता कर्फ्यूवर करडी नजर असणार आहे .

    या कडक जनता कर्फ्यू दरम्यान पोलीस प्रशासनाचे चार जवान २४ तास गावात व शेळवे परिसरात सर्वञ पाहणी करणार आहेत. विनाकारण फिरणार्यांवर पोलीस कारवाई होणार आहे तर तोंडाला मास्क नसल्यास ५०० रुपये दंड आकारणार असल्याची माहीती शेळवे ग्रामपंचायत व ग्रामस्तरिय समिती शेळवे यांनी बोलताना दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: