lakhimpur kheri incident : लखीमपूर हिंसाचार; अखेर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाची पोलीस कोठडीत रवानगी


लखनऊः लखीमपूर खिरी हिंसाचारातील ( Lakhimpur Kheri Incident ) मुख्य आरोपी आशिष मिश्रा ( ashish mishra ) याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आले. मात्र, पोलिसांनी १४ दिवसांची कोठडी मागितली होती. कोर्टाने आशिष मिश्राला कोर्टाने १२ ते १५ ऑक्टोबरपर्यंत अशी तीन दिवसांची पोलीस कोठडीत सुनावली आहे. आशिष मिश्रा हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आहे.

आशिष मिश्राला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिर्यादी पक्षाकडून १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. यावर सुनावणी करताना कोर्टाने तीन दिवसांची कोठडी मंजूर केरली आहे. यासोबतच कोर्टाने काही अटीही घातल्या आहेत. आशिष मिश्रा हा १२ ऑक्टोबरपासून ते १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रहावं लागेल. यादरम्यान त्याची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि त्याला कुठलीही मारहाण केली जाणार नाही. तो आपल्या वकिलांशी दूर राहून बोलू शकतो, असं सरकारी वकील एसपी यादव यांनी सांगितलं.

lakhimpur kheri incident : लखीमपूर प्रकरणावर भाजपचे डॅमेज कंट्रोल; दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणात ८ जणांचा मृत्यू झाला होता. ३ ऑक्टोबरला ४ शेतकऱ्यांना कारखाली चिरडण्यात आलं. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा प्रमुख आरोपी आहे. १२ तासांच्या चौकशीनंतर शनिवारी रात्री लखीमपूरमध्ये त्याला अटक करण्यात आली होती.

aryan khan mehbooba mufti : ‘खान असल्यामुळे शाहरुखच्या मुलाला टार्गेट केलं जातंय’, मुफ्तींचा भाजपवरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: