तुमची पण एलआयसी पॉलिसी आहे का? अदानीचे शेअर घसरल्याने LIC चे कोट्यवधी बुडाले


नवी दिल्ली: देशातील श्रीमंतापैकी एक असलेले गौतम अदानी यांची कंपनी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. अदानी कंपनीचे शेअर्स सतत कोसळत आहेत. अवघ्या दोन दिवसांत या कंपनीच्या गुंतवणूकदारांचे तब्बल ४.२ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. तर या कंपनीचे मार्केट कॅप २२ टक्क्यांनी घसरले आहेत. अदानीचं हे इतकं मोठं नुकसान हे हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमुळे झालं आहे. अदानीच्या शेअर्सच्या घसरणीने लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची (LIC) चिंताही वाढवली आहे.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने अदानींच्या कंपन्यांमध्ये खूप पैसा गुंतवला आहे. अदानीच्या पाच कंपन्यांमध्ये एलआयसीचा ९ टक्के हिस्सा आहे. एलआयसीने अदानीच्या कंपन्यांमध्ये सुमारे ७७,२६८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अदानींच्या कंपन्यांचे शेअर घसरल्याने कंपनीच्या रिटेल आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनाही धक्का बसला आहे. एलआयसी ही अदानी कंपनीची महत्त्वाची गुंतवणूकदार आहे.

अदानी कंपनीचे शेअर्स घसरल्याने गेल्या दोन दिवसांत एलआयसीने तब्बल १६,५८० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे एलआयसीला तब्बल ६,२३२ कोटींचा फटका बसणार आहे. या कंपनीत त्यांची ५.९६ टक्के भागीदारी आहे.तर अदानी एंटरप्रायझेसमध्ये ४.२३ टक्के भागीदारी आहे. अदानीचे शेअर्स घसरल्याने एलआयसीला ३२४५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, अदानी पोर्टमुळे एलआयसीला ३०९५ कोटींचे, तर अदानी ट्रान्समिशनमुळे ३०४२ कोटींचे नुकसान झाले आहे.

अदानी ग्रीनमधील एलआयसीची भागीदारी १.२८ टक्के आहे, ज्यामुळे एलआयसीला ८७५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर अदानी टोटल गॅसमुळे ६,३२३ कोटींचे नुकसान एलआयसीला सहन करावे लागत आहे. त्यामुळे एलआयसीची चिंता वाढली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: