कमी गुंतवणुकीत मोठी कमाई करा, असे आहेत सोपे ५ मार्ग; जाणून घ्या श्रीमंत होण्याच्या बेस्ट टिप्स


मुंबई : जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसा पुरेसा नसेल तरी देखील कमी पैशात अधिक पैसा निर्माण करणे अशक्य नाही. पैसा कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. त्या मार्गांचा अवलंब केल्यास तुम्ही देखील तुमचे उत्पन्न वाढवू शकाल. आपण इथे असे ५ मार्ग पाहणार आहोत ज्यांद्वारे आपण आपले उत्पन्न वाढवू शकू. तसे पाहायला गेलं तर कमीतकमी गुंतवणुकीद्वारे अधिकाधिक पैसा कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. फक्त तुम्हाला तुमच्या हिशोबाने योग्य रणनीती, कौशल्य आणि रुची आणि स्त्रोत पाहून निर्णय घ्यावा लागणार आहे. योग्य संधीचा वापर करून तुम्ही नव्या मार्गांचा शोध घेऊ शकता. आता पाहू या असे कोणते मार्ग आहेत ते…

तुमची कौशल्ये आणि विशेषतांद्वारे पैसा कमवा

जर तुमच्याकडे विशेष गुण किंवा ज्ञान, कौशल्य असेल तर तुम्ही फ्रीलान्स किंवा कंसल्टिंगचे काम करून पैसा कमावू शकता. हा पैसे कमावण्याचा एक सर्वात कमी खर्चाचा मार्ग आहे. तर तुमच्याकडे कौशल्ये असतील तर कुठूनही तुमचे काम सुरू करू शकता. आजकाल ऑनलाइन टिचिंग कोर्स, आर्टिकल लिहिणे, ब्लॉग लिहिणे असे अनेक कन्सल्टिंग सर्व्हिसच्या प्रकारातील अनेक कामे वेबसाइट किंवा पब्लिकेशनद्वारे करू शकता.

क्लिक करा आणि वाचा- Women’s T0 U19 World Cup Final मध्ये भारतासमोर इंग्लंड; वाचा, कधी आणि कुठे पाहाल लाइव्ह सामना

आपले घर किंवा खोली भाड्याने देणे

जर तुमच्याकडे अधिकची खोली किंवा घर असेल आणि त्याचा तुम्ही वापर करत नाही आहात, तर तुम्ही Airbnb सारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भाड्याने देऊन पैसे कमवू शकता. हा अतिरिक्त पैसे कमावण्याचा एक सोपा आणि कमी भांडवलाचा मार्ग आहे. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार केव्हा आणि किती दिवसांसाठी तुमचे घर किंवा खोली भाड्याने देणे आहे दिवस निवडू शकता.

क्लिक करा आणि वाचा- वाहनांच्या कर्कश आवाजांनी घेतले १४ हरणांचे बळी, जीव वाचवण्यासाठी घेतल्या होत्या उड्डाणपुलावरून उड्या

डिव्हिडंड (लाभांश) देणारे स्टॉक्स

लाभांश देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हाही एक पैसा कमावण्याचा सोपा मार्ग आहे. डिव्हिडंड स्टॉक हे असे स्टॉक असतात, जे लाभांशाच्या दृष्टीने शेअरधारकांना आपल्या फायद्याचा एक हिस्सा मिळवून देत असतात. जे गुंतवणूकदार अधिक उत्पन्नासाठी कमी जोखमीच्या पर्यायाच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.

पेमेंट करणाऱ्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये भाग घ्या

जर तुमच्याकडे अतिरिक्त वेळ शिल्लक असेल तर तुम्हाला प्रश्नांची उत्तर देण्यात काहीच अडचण नाही. तर मग तुम्ही पेमेंट करणाऱ्या सर्वेक्षणात भाग घेऊन पैसे कमवू शकता. तथापि, यात तुम्हाला अधिक पैसे कमावता येईलच असे नाही, मात्र कमी भांडवलात पैसे कमावण्याचा हा चांगला मार्ग आहे.

क्लिक करा आणि वाचा- शिक्षकाकडून काळिमा फासणारे कृत्य; शारीरिक शिक्षणाच्या तासाला विद्यार्थिनींना…, नंतर असे मेसेज करायचा

सोशल मीडिया फॉलोअर्सच्या माध्यमातून करा कमाई

जर तुमच्याकडे सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॉलोअर्स असतील, तर तुम्ही ब्रँडसोबत भागीदारी करून आपल्या फॉओर्समध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्याचे काम करू शकता. उदा. तुम्ही ब्युटी प्रोडक्ट प्रमोट करण्याचे काम करू शकता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: