it raids : नोटांच्या बंडलनी खच्चून भरले कपाट! IT च्या छाप्यात १४२ कोटींची रोकड जप्त


नवी दिल्लीः आयकर विभागाने हैदराबादमधील हेटेरो फार्मास्युटिकल ग्रुपवर काही दिवसांपूर्वी छापा टाकला. या छाप्यात ५५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील तब्बल १४२ कोटी रुपयांची रोकड सापडली. आयकर विभागाला नोटांची अनेक बंडल मिळल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, इंटरनेटवर एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोमध्ये एका उघड्या कपाटात नोटांचे अनेक बंडल दिसत आहेत. पण कपाट नोटांनी भरलेले असल्याची कोणतीही अधिकृत माहिती आयकर विभागाने दिलेली नाही.

आयकर विभागाने हेटेरो फार्मास्युटिकल ग्रुपच्या ६ राज्यांमधील ५० ठिकाणांवर छापे टाकले. आयकर विभागाकडून गेल्या आठवड्यात बुधवारपासून या प्रकरणी तपास सुरू होता. यात अनेक बनावट कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. बनावट बिले, कर चोरीसह कंपनीने मनी लाँड्रींगही केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हेटेरो फार्मा ही कंपनी करोनावरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचे उत्पादन करते आणि त्यांची निर्यातही करते. अमेरिका, युरोप आणि आखाती देशांसह आफ्रिकेतही हेटेरो कंपनीची औषधं निर्यात केली जातात. करोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल-मे दरम्यान कंपनीने काही औषधांचा अतिशय कमी पुरवठा केला होता आणि औषधांची निर्यात केली होती.

कंपनीच्या ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात ५५० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. छाप्यात एका ठिकाणी खात्यांची नोंदी असलेल्या वह्यांचा दुसरा संच आणि रोख रक्कम सापडली. पेन ड्राइव्हसारखे काही डिजिटल पुरावेही हाती आले आहेत. काही आक्षेपार्ह कागदपत्रांचे पुरावेही जप्त करण्यात आले आहेत, असं आयकर विभागाने म्हटलं आहे. करचुकवून मोठ्या प्रमाणात अवैध रोकड जमा केली गेली आणि यातून जमीन आणि इतर मालमत्तांची खरेदी केली गेली, असा दावा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी ६ ऑक्टोबरला छापा सत्र सुरू झालं आणि ९ ऑक्टोबरला ते संपलं. यानंतर गेल्या आठवड्यात शनिवारी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.

JK: ‘दहशतवाद्यांना सहानुभूती’चा आरोप, ७०० हून अधिक पोलिसांच्या ताब्यात

पण रोकड असलेला फोटो हा खरा आहे की खोटा? हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, आयकर विभागाच्या छाप्यात १४२ कोटी रुपयांची रोकड जप्त केली गेली, याची माहिती विभागाने दिली आहे. एखाद्या कंपनीवर टाकलेल्या छाप्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेक कंपन्यावर टाकलेल्या छाप्यात रक्कम जप्त केली गेली आहे. आयात-निर्यात व्यवसाय करणाऱ्या एका खासगी कंपनीवर छापा घालण्यासाठी आयकर अधिकारी कोलकातामध्ये गेले होते. अधिकारी इमारतीत शिरू लागताच वरच्या खिडकीतून नोटांचा पाऊस पडू लागला. रस्त्यावर नोटा उडताना दिसल्या. जवळपास १० लाख रुपयांच्या २०००, ५०० आणि १०० च्या नोटांचे बंडल फेकण्यात आले होते.

power crisis : देशात वीज संकट? अमित शहांची ऊर्जा आणि कोळसा मंत्र्यांसोबत बैठकSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: