maneka gandhi : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून हटवले; मनेका गांधींनी सांगितली ‘मन की बात’!


सुलतानपूरःमनेका गांधी या उत्तर प्रदेशातील सुलतानपूरच्या भाजपच्या खासदार आहेत. त्या सुलतानपूर मतदारसंघाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याच्या मुद्द्यावर यावेळी मनेका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीतून काढणं ही काही मोठी गोष्ट नाही. त्यामुळे आपल्याला काहीही फरक पडलेला नाही. गेल्या २० वर्षांपासून आपण भाजपमध्ये आहोत. यामुळे कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने माझी पक्षातील पत घसरणार नाही. माझा पहिला धर्म हा जनतेची सेवा करणं हा आहे. यामुळे कुठलंही पद मिळण्यापेक्षा जनतेची मनात स्थान मिळणं अधिक महत्त्वाचं आहे, असं उत्तर मनेका गांधी यांनी दिलं.

राष्ट्रीय कार्यकारिणी दरवर्षी बदलली जाते. कार्यकारिणी बदलणे हा पक्षाचा अधिकार आहे. ती बदलली गेली, तर त्यात मोठी गोष्ट काय आहे? पक्षात इतरही वरिष्ठ नेते आहेत. त्यांना आतापर्यंत राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. यामुळे नवीन नेत्यांनाही संधी मिळाली पाहिजे. माझ्या कर्तव्याची मला जाणीव आहे. जनतेची सेवा करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. यामुळे कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने चिंता करण्यासारखे काही नाही, असं मनेका गांधी म्हणाल्या.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ७ ऑक्टोबरला पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली होती. मनेका गांधी आणि त्यांचे पुत्र वरुण गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना या कार्यकारिणीतून वगळण्यात आले. केंद्राच्या नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजूने वरुण गांधींनी सतत बोलत आहेत.

lakhimpur kheri incident : लखीमपूर हिंसाचार; अखेर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाची पोलीस कोठडीत रवानगी

काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी हे कार्यकारिणीचे नवीन सदस्य आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारमण कार्यकारिणीत कायम आहेत. केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंग, प्रल्हाद पटेल, सुब्रमण्यम स्वामी, सुरेश प्रभू, वसुंधरा राजे, दुष्यंत सिंह, विजय गोयल, विनय कटियार आणि एस. एस. अहलुवालिया यांना नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही.

Lakhimpur Violence: ‘आशिष ऐवजी जर कुणी अतिक असता तर…’, ओवैंसींची सत्ताधाऱ्यांवर टिप्पणी

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी विविध विषयांवर चर्चा करते आणि संघटनेच्या कामकाजाची रुपरेषा ठरवते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: