Rcb Vs Kkr : आरसीबीविरुद्धचा सामना सुरु होण्यापूर्वीच कोलकाताला बसला मोठा धक्का, जाणून घ्या..शारजा : आरसीबीविरुद्धचा महत्वाचा सामना सुरु होण्यापूरर्वीच कोलकाता नाइट राडयर्सच्या संघाला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण या महत्वाच्या सामन्यात केकेआरचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल खेळणार, अशी जोरदार चर्चा होती आणि आरसीबीनेही त्याचा धसका घेतला होता. पण आजच्या य महत्वाच्या सामन्यात रसेल खेळणार नसल्यामुळे केकेआरच्या संघाला आता मोठा धक्का बसला आहे.

आरसीबीसाठी या सामन्यापूर्वी दोन मोठे धक्के बसलेच आहेत. कारण संघातील दोन खेळाडू स्पर्धा अर्ध्यावरती सोडून मायदेशी परतले आहेत. हे दोन्ही खेळाडू आता उर्वरीत आयपीएलमध्ये आरसीबीचा भाग असणार नाहीत. आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरू होण्यापूर्वी त्यांना आरसीबीने आपल्या गोटात घेतले होते. वानिंदू हसरंगा आणि दुश्मंथा चमिरा हे ते दोन खेळाडू आहेत. टी-२० विश्वचषकातील पात्रता सामन्यांसाठी दोघेही श्रीलंका संघात सामील होतील. त्यामुळे दोघांनाही आरसीबीच्या बायो बबलमधून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे या सामन्यापूर्वीच आरसीबीच्या संघाला हा मोठा धक्का बसा आहे. पण आरसीबीला जर मोठा धक्का बसला असला तरी दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात धडाकेबाज अष्टपैलू आंद्रे रसेल खेळणार की नाही, याची उत्सुकता चाहत्यांना होती. कारण गेल्यावेळी जेव्हा केकेआर आणि आरसीबी यांच्यामध्ये सामना झाला होता तेव्हा रसेलने आरसीबीच्या एबी डिव्हिलियर्सला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. त्यामुळे रसेल हा केकेआरसाठी हुकमी एक्का असल्याचे पाहायला मिळाले होते.

आरसीबीला जर आजच्या सामन्यात पराबव पत्करावा लागला तर कर्णधार विराट कोहलीसाठी हा मोठा धक्का असेल. कारण आतापर्यंत कोहलीच्या नेतृत्वाखाली एकदाही आरसीबीच्या संघाला जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे कोहलीच्या कारकिर्दीवर हा एक मोठा ठपका बसू शकतो. त्यासाठी कोहली आजच्या सामन्यात जीवाचे रान करेल. आजचा सामना जिंकल्यावर पुन्हा एकदा आरसीबीला बुधवारी दिल्ली कॅपिटल्सबरोबर क्वालिफायर्स-२ या सामन्यात खेळावे लागेल. या सामन्याच जर आरसीबीने विजय मिळवला तरच त्यांना अंतिम फेरीत पोहोचता येणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: