RCB OUT OF IPL : आरसीबीसह विराट कोहलीचे जेतेपदाचे स्वप्न भंगले, केकेआर आता दिल्लीशी भिडणार


शारजा : आरसीबी आणि विराट कोहली यांचे आयपीएलचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न आता भंगले आहे. काण कोहलीला आपल्या नेतृत्वाखाली आरसीबीला आता जेतेपद जिंकवून देता याणार नाही. कारण आजच्या एलिमिनेटरच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने आरसीबीच्या संघावर दमदार चार विकेट्स राखत विजय मिळवला. त्यामुळे कोलकाताच्या संघाने फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता कोलकाताच्या संघाला दिल्ली कॅपिटल्सबरोबर १३ ऑक्टोबरला दोन हात करावे लागतील आणि हा सामना जिंकल्यावर त्यांना बाद फेरीत पोहोचता येणार आहे.

आरसीबीच्या संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी यावेळ संघाला दमदार सुरुवात करून दिली. पण कोलकाताचा फिरकीपटू सुनील नरीनने यावेळी विराट कोहलीला बाद केले आणि त्यानंतर आरसीबीचा डाव गडगडल्याचे पाहायला मिळाले. कारण कोहली बाद झाल्यावर श्रीकर भरत आणि ग्लेन मॅक्सवेल या दोन्ही फॉर्मात असलेल्या फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही आणि आरसीबीच्या संघाला मोठी धावसंख्या रचण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे कोलकाताच्या संघाला यावेळी आरसीबीवर चांगलाच अंकुश ठेवता आले. आरसीबीला चांगल्या सुरुवातीनंतरही कोलकातापुढे १३९ धावांचेच माफक आव्हान ठेवता आले.

कोलकातापुढे १३९ धावांचे माफक आव्हान असताना कोलकाताच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. पण त्यानंतर आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने यावेळी केकेआरच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यामुळे हा सामना चांगलाच रंगतदार झाला होता. आरसीबीच्या युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज यांनीही यावेळी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवले खरे, पण त्यांना कोलकाताच्या धावा रोखता आल्या नाहीत. सुनील नरिन पुन्हा एकदा कोलकाताच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले. कारण नरिनने यावेळी १५ चेंडूंमध्ये तीन षटकारांच्या जोरावर २५ धावा केल्या आणि सामना केकेआरच्या बाजूने झुकवला. त्यानंतर कोलकाताचा कर्णधार इऑन मॉर्गन आणि अष्टपैलू शकिब अल हसन यांनी अखेरच्या क्षणी चांगली फलंदाजी केली. त्यामुळेच कोलकाताला संघाला विजयावर शिक्कामोर्तब करता आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: