coronavirus latest update: राज्याला आज मोठाच दिलासा! करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दीड वर्षानंतर पहिल्यांदाच इतकी मोठी घट


हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात १ हजार ७३६ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ हजार ०३३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण ३६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्याला आज मोठा दिलासा मिळाला असून आज कालच्या तुलनेत करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. तसेच राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही कमी होत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, कालच्या तुलनेत मृत्यूची संख्या वाढली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात १ हजार ७३६ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या मार्चपासून झालेली ही सर्वात मोठी घट आहे. काल ही संख्या २ हजार २९४ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ०३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या १ हजार ८२३ इतकी होती. तर, आज ३६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या २८ इतकी होती. (maharashtra registered 1736 new cases in a day with 3033 patients recovered and 36 deaths today)

आज राज्यात झालेल्या ३६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ०४ हजार ३२० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३४ टक्के इतके आहे.

क्लिक करा आणि वाचा- प्रवीण दरेकरांचा मलिकांवर हल्लाबोल; जावयाचे ड्रगप्रकरण काढत म्हणाले…

सक्रिय रुग्णसंख्येचा ग्राफ पुन्हा आला खाली

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३२ हजार ११५ इतकी आहे. काल ही संख्या ३३ हजार ०११ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ८ हजार ४६५ इतकी आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ४ हजार ४४६, तर अहमदनगरमध्ये ही संख्या ३ हजार ५०९ इतकी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या १ हजार ६२८ अशी खाली आली आहे. तसेच, सांगलीत एकूण ८४० इतकी आहे. तर, सोलापुरात ही संख्या ७५६ इतकी खाली आली आहे.

क्लिक करा आणि वाचा- दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा, ऊर्जा राज्यमंत्री म्हणाले…

मुंबईत उपचार घेत आहेत ५,९६९ रुग्ण

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ९६९ इतकी आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ७१६ तर, रत्नागिरीत ४७८ इतकी कमी झाली आहे, तर सिंधुदुर्गात ती ५७३ इतकी आहे.

भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी २ सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४४७, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७० इतकी आहे. अमरावतीत ही संख्या ९६ वर आली आहे. तर भंडारा जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी म्हणजेच २ सक्रिय रुग्ण आहेत.

क्लिक करा आणि वाचा- अमृता फडणवीस यांची महाविकास आघाडीला पुन्हा डिवचले, म्हणाल्या…

२,३८,४७४ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ०३ लाख ०३ हजार ७४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ७९ हजार ६०८ (१०.९१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ३८ हजार ४७४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार १६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: