पराभवानंतर विराट कोहलीचा मोठा निर्णय; आरसीबीच्या संघाकडून खेळणार की नाही, जाणून घ्या…


शारजा : आरसीबीला आजच्या सामन्यात पराबव पत्करावा लागला आणि कर्णधार कोहलीच्या कारकर्दीवर मोठा ठपका पडला. त्यामुळे आक्रमक असलेला विराट पराभव झाल्यानंतर चांगलाच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. होते. भावनेच्या भरात विराटने यावेळी काही गोष्टींचा उलगडा केला आहे.

सामना संपल्यावर विराट म्हणाला की, ” आतापर्यंत मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन वर्षांमध्ये संघाची चांगली बांधणी झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण आता यापुढे मी आरसीबीचा कर्णधार राहणार नाही. पण अखेरच्या दिवसापर्यंत मी आरसीबीबरोबर असलेली कमिटमेंट कायम ठेवणार आहे. मी आरसीबीचा कर्णधार नसलो तरी संघाबरोबर एक खेळाडू म्हणून नक्कीच कायम असेन.” हा सामना सुरु होण्यापूर्वी विराटकडून ेक मोठी चुक घडल्याचे पाहायला मिळाले. केकेआरविरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकली आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आतापर्यंतचा कोलकाताच्या संघाला युएईमधला रेकॉर्ड पाहिला तर त्यांनी इथे एकही सामना धावांचा पाठलाग करताना गमावलेला नाही. त्याचबरोबर आरसीबीचा संघ हा आतापर्यंत धावांचा पाठलाग यशस्वीपणे करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे कोहलीचा हा निर्णय दोन्ही बाजूंनी चुकल्याचेच पाहायला मिळाले आहे.
विराट कोहली मैदानात का भडकला, पाहा…
आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात कोलकाताचा राहुल त्रिपाठी अपयशी ठरला आणि चेंडू त्याच्या पॅडला लागला. त्यावेळी चहलसह आरसीबीच्या संघाने जोरदार अपील केले. पण मैदानातील पंचांनी राहुलला नाबाद ठरवले. त्यानंतर कोहलीने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी पाहिलेल्य रिप्लेमध्ये राहुल हा बाद असल्याचे दिसत होते. राहुलला यावेळी तिसऱ्या पंचांनी बादही दिले. तिथेच खरंतर सर्वकाही संपले होते. पण कोहलीचा पारा तेव्हा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला. कारण त्यावेळी तो मैदानातील पंचांकडे गेला आणि त्यांच्याशी हुज्जत घालायला लागला. कोणत्याही आदर्श कर्णधाराला ही गोष्ट नक्कीच शोभणारी नव्हती. क्रिकेटसारख्या सभ्य गृहस्थांच्या खेळात ही गोष्ट कोणत्याही कर्णधाराला शोभणारी नक्कीच नाही. कारण चुक सुधारल्यावरही पंचांशी हुज्जत घालणे, याचे कोणीही समर्थन करू शकत नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: