poonch encounter : काश्मीरमध्ये पंजाबचे तीन जवान शहीद; कुटुंबीयांना ५० लाखांची मदत आणि नोकरी


चंदिगडः जम्मू -काश्मीरमध्ये पूंछ येथे आज झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद झाले. यातील तीन जवान हे पंजाबचे आहेत. या तीन जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत पंजाब सरकारने जाहीर केली आहे. शहीद नायब सुभेदार जसविंदर सिंग, नाईक मनदीप सिंग आणि शिपाई गज्जन सिंग यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी केली आहे.

मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी चकमकीत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये झालेला दहशतवादी हल्ला निषेधार्ह आहे. यात आमचे शूर नायब सुभेदार जसविंदर सिंग, शिपाई गज्जन सिंग, नाईक मनदीप सिंग, सप्टेंबर सराज सिंह आणि सप्टेंबर वैशाख एच यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या दुःखाच्या प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त करतो, असं चरणजीत सिंग चन्नी यांनी ट्विट करून म्हटलंय.

poonch encounter : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, ५ जवान शहीद

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून चकमकीत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. या शूर जवानांना सॅल्यूट, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

JK: ‘दहशतवाद्यांना सहानुभूती’चा आरोप, ७०० हून अधिक पोलिसांच्या ताब्यात

पूंछमध्ये झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद झाले. यातील तीन जवान ह पंजाबचे आणि १ उत्तर प्रदेश आणि एक केरळचा आहे. हे जवान भारतीय लष्कराच्या १६ राष्ट्रीय राफल्समध्ये होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: