खाजगी रुग्णालयातील रुग्ण,नातेवाईकांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना
खाजगी रुग्णालयातील रुग्ण,नातेवाईकांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना Patients in private hospitals, relatives Instructions for testing the corona
जिल्हाधिकाऱ्यांचे रुग्णालयांना पत्र

वाशिम,(जिमाका) - कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात खाजगी कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल यांना नियमांच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे. या ठिकाणी उपचार घेत असलेल्या नातेवाईकांची रुग्णालयाच्या परिसरात गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेवून या ठिकाणी येणाऱ्या सर्व रुग्णांची,रुग्णांच्या नातेवाईकांची आरटीपीसीआर चाचणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी डॉक्टरांना पत्राद्वारे दिल्या आहेत.
तसेच जिल्ह्यातील इतरही खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या इतर आजारांच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तेथेही रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयामध्ये व रूग्णालयाबाहेर गर्दी करतात. याठिकाणी सुद्धा येणाऱ्या नातेवाईकांची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच उपचारासाठी आलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे दिसल्यास त्यांना प्रथम आरटीपीसीआर चाचणी करण्यास सांगावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व खाजगी डॉक्टरांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.