Martina Navratilova: मोदींना ‘लोकशाही नेते’ म्हणणाऱ्या अमित शहांवर प्रसिद्ध खेळाडूची टिप्पणी चर्चेत


हायलाइट्स:

  • अमेरिकेची प्रसिद्ध खेळाडू मार्टिना नवरातिलोव्हा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर टीका
  • मार्टिनाच्या ट्विटवर नेटकऱ्यांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया

नवी दिल्ली : नुकत्याच एका मुलाखतीत भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदीहुकूमशहा‘ प्रवृत्तीचे नसून त्यांच्यासारखा लोकशाहीवादी नेता आजपर्यंत भारताला लाभला नव्हता’ असं वक्तव्य केलं होतं. गृहमंत्र्यांच्या याच वक्तव्याला अमेरिकेची प्रसिद्ध टेनिस खेळाडू मार्टिना नवरातिलोव्हा हिने हास्यास्पद म्हटलंय. (Martina Navratilova responds to Amit Shah‘s praise of Narendra Modi)

गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रकाशित करण्यात आलेलं एक ट्विट रिट्विट करत ‘याहून हास्यास्पद काय असेल’ असं ट्विट मार्टिना नवरातिलोव्हा हिने केलंय.

मार्टिना नवरातिलोव्हाचं ट्विट

aryan khan mehbooba mufti : ‘खान असल्यामुळे शाहरुखच्या मुलाला टार्गेट केलं जातंय’, मुफ्तींचा भाजपवर आरोप
Targeted Killings In JK: ‘जम्मू-काश्मीरच्या सामान्य नागरिकांकडून हिंसा आणि हत्यांचं समर्थन नाही’

मार्टिना नवरातिलोव्हा ही आपल्या काळातील टेनिसमधली सर्वोत्तम खेळाडू राहिलीय. तिनं आपल्या करिअरमध्ये १८ ग्रॅन्डस्लॅम नावावर केलेत. समलैंगिक अधिकार तसंच लोकशाही मूल्यांचं समर्थन मार्टिनानं अनेकदा केलंय.

भारताच्या राजकारणाबद्दल अमेरिकेच्या टेनिस खेळाडूनं केलेल्या टिप्पणीनंतर यावर नेटकऱ्यांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

poonch encounter : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, ५ जवान शहीद
JK: ‘दहशतवाद्यांना सहानुभूती’चा आरोप, ७०० हून अधिक पोलिसांच्या ताब्यात
ट्रम्प – मोदी सरकारच्या धोरणांवर टीका

मार्टिनानं या अगोदरही अमेरिकेतील माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका केली होती. भारतात लागू केल्या जाणाऱ्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’बद्दल मार्टिनानं २०१९ मध्ये एक ट्विट केलं होतं. ‘४० लाख भारतीय नागरिक कदाचित उद्यापासून राज्यातून निष्कासित केले जातील. वेळ सारखीच दिसतेय का? मोदी आणि ट्रम्प एकाच शाळेत शिकले नसले तरी दोघांची विचारधारा सारखीच आहे’, अशी तिखट टिप्पणी मार्टिनानं केली होती.

अमित शहांचं वक्तव्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १० ऑक्टोबर रोजी ‘संसद टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केले जाणारे निरंकुश किंवा हुकूमशाही वृत्तीचे आरोप बिनबुडाचे आहेत’ असं म्हटलं होतं. ‘पंतप्रधान मोदींशी आपला अनेक दशकांपासूनचा संपर्क आहे. पंतप्रधान मोदी हे लोकशाही मानणारे नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा समजून आणि ऐकून घेणारा नेता आपण पाहिलेला नाही. पंतप्रधान मोदी छोट्यातल्या छोट्या कामगाराचेही धीराने ऐकतात’ असंही अमित शहा यांनी यावेळी म्हटलं होतं.

Jammu Kashmir: बांदीपोरा, अनंतनागमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
India China: भारत चीन सैन्य अधिकाऱ्यांची आठ तास बैठक, लडाख सीमेसंबंधी चर्चा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: