ऋतुराजच्या डोक्यात काय चालू असतं? अंतिम फेरी गाठल्यानंतर धोनीनं केला खुलासा


दुबई : चेन्नई सुपरकिंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला काय हवे आहे, तो काय विचार करतो, त्याला काय करायचे आहे? फलंदाजीच्या योजनेबद्दल त्याच्या मनात काय सुरू असते? या सगळ्या गोष्टी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला माहीत आहेत. पुन्हा एकदा फिनिशरच्या भूमिकेत कमबॅक केलेल्या धोनीने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केल्यानंतर जे विधान केले, त्यावरून तो ऋतुराज गायकवाडच्या मनात ज्या काही गोष्टी सुरू असतात, त्याचा अभ्यास धोनीने केला असल्याचे दिसून येते.

वाचा- धोनीच्या ६ चेंडूत १८ धावा: विराट म्हणाला, किंग इज बॅक; ओम फिनिशाय नम:

आयपीएल २०२१ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने दिल्लीचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. या विजयात सलामीवीर ऋतुराज गायकवाडने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. चेन्नईच्या डावाची सुरवात खराब झाली असली तरी सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा या दोघांनी मोठी भागिदारी करत विजयाचा पाया पक्का केला. ऋतुराजने ५० चेंडूत ७० धावा केल्या. यावेळी त्याने ५ चौकार आणि २ षटकार लगावले. या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.

वाचा- आले शंभर, गेले शंभर; चेन्नई सुपर किंग्ज एक नंबर; असे कमबॅक कोणालाच जमले नाही

सामन्यानंतर धोनी म्हणाला की, “जेव्हा ऋतुराज आणि मी एकमेकांशी बोलत असतो, तेव्हा ते एक साधे संभाषणच असते, पण त्यावेळी ऋतुराजच्या मनात काय सुरू असते, तो काय विचार करत आहे? हे जाणून घेण्याकडे माझे लक्ष असते. ऋतुराज हा असा खेळाडू आहे, ज्याला संपूर्ण २० षटके फलंदाजी करायला आवडते. त्याच्या खेळात खूप सुधारणा झाली आहे, हे पाहून मला आनंद झाला.”

वाचा- क्रिकेट न्यूजBCCIने टी-२० वर्ल्डकप संघात बदल केला का? जाणून घ्या मोठी अपडेट

ऋतुराजनेही धोनीला दिलं यशाचं श्रेय
ऋतुराज म्हणाला की, “धोनी मला नेहमीच प्रोत्साहित करत असतात. त्यामुळे मला अधिक चांगले खेळण्यासाठी प्रेरणा मिळते. ते मला प्रत्येक सामन्यात एकच गोष्ट सांगतात की, जी आणि खेळ संपवून ये. धोनीने दाखविलेल्या विश्वासाचा परिणाम ऋतुराजच्या कामगिरीवरही दिसून येत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये ऋतुराजने एक शतकही झळकावलं आहे.

वाचा- मुंबई इंडियन्स घेणार मोठा निर्णय; या खेळाडूंना मिळणार डच्चू!

‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकण्यात अग्रेसर
युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलमध्ये सर्वाधिक ६ वेळा सामनावीरचा पुरस्कार जिंकणारा ऋतुराज हा पहिला खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक ४ ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकणारा तो माईक हसीनंतरचा दुसरा खेळाडू आहे. तसेच यंदाच्या आयपीएल स्पर्धेत ऑरेंज कॅप जिंकण्याचा तो प्रबळ दावेदारही आहे. फाफ डु प्लेसिससह डावाची सुरवात करण्यात तो आता तरबेज झाला आहे. ही अशी पहिली सलामीची जोडी आहे, ज्यांनी एका मोसमात ५ किंवा अधिक अर्धशतके केली आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: