Maharashtra Cinema Hall Guidelines: राज्यात चित्रपटगृहे, नाट्यगृहे ‘या’ तारखेपासून उघडणार; अशी आहे नियमावली…


हायलाइट्स:

  • चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून उघडणार.
  • राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली नियमावली.
  • करोनाची पकड सैल होऊ लागल्याने घेतला निर्णय.

मुंबई: राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह उघडण्यास तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह येत्या २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असून त्यासाठीची नियमावली राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने आज जाहीर केली आहे. मुख्य म्हणजे, केंटन्मेंट झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणीच चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्यात आली आहे. ( Maharashtra Cinema Hall Guidelines )

वाचा:आर्यनला पकडून नेणारा किरण गोसावी गोत्यात; फसवणुकीचं नवं प्रकरण उघड

राज्यात करोनाची पकड सैल होऊ लागल्याने ब्रेक द चेन अंतर्गत चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ सप्टेंबरच्या बैठकीत घेतला होता. टास्क फोर्सशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला होता. अखेर यासंदर्भातील घोषणा राज्य सरकारने केली असून यासाठी २२ ऑक्टोबरचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. दरम्यान, यासाठी नियमांची चौकट घालून देण्यात आली असून नियमांचे पालन न करणाऱ्यांविराधोत नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

वाचा:अनिल देशमुखांच्या घराची ९ तास झडती; अटक वॉरंटची चर्चा होती, पण…

काय आहे नाट्यगृह आणि चित्रपटगृहांसाठी नियमावली

– प्रतिबंधित क्षेत्रात नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी नाही.
– जिल्हाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून निर्णय घ्यावा.
– कलाकार, कर्मचारी वृंद यांनी नियमितपणे तपासणी करावी.
– मास्क, सॅनिटायजरचा वापर आवश्यक.
– प्रेक्षकांना कलाकारांच्या कक्षेत भेटण्यास मज्जाव.
– केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्यांनी पीपीई किटस परिधान करावे.
– आरोग्यसेतू अ‍ॅप बंधनकारक.
– कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
– ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करता येणार नाही.
– आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.

वाचा:‘हजार कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्यानेच…’; बंदवरून विखेंचा आरोपSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: