करोनावरील उपचारासाठी औषधाला मान्यता देण्याची मागणी


वॉशिंग्टन: करोनावरील गोळीला मान्यता देण्याची मागणी ‘मर्क’ या औषध कंपनीने अमेरिकेच्या औषध नियामकांकडे सोमवारी केली आहे. या गोळीला मान्यता मिळाल्यास करोनाविरोधी जागतिक लढा सुकर करण्यासाठी पूर्णपणे नवीन आणि वापरण्यास सुलभ असे शस्त्र प्राप्त होईल, असे ‘मर्क’ने म्हटले आहे.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मंजुरी दिल्यास काही आठवड्यांत करोनावरील गोळीबाबतचा निर्णय जाहीर होऊ शकतो. तसे झाल्यास करोनारुग्णांवरील उपचारासाठी प्रथमच गोळीचा वापर होऊ शकणार आहे. सध्या एफडीएची मंजुरी मिळालेल्या उपचारांसाठी आयव्ही किंवा इंजेक्शनची आवश्यकता असते. ‘मर्क’ आणि त्यांची भागीदार कंपनी ‘रिजबॅक बायोथेराप्युटिक’ यांनी करोनावरील उपचारासाठी मोलनुपिरावीर या कॅप्सुलची निर्मिती केली आहे.

‘या’ लशीची ब्लू प्रिंट चोरून रशियाने तयार केली ‘स्पुटनिक व्ही’ लस; ब्रिटनचा खळबळजनक दावा

जगातील पहिल्या मलेरियाविरोधी लशीला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी

ही अँटीव्हायरल गोळी करोनारुग्ण त्यांची लक्षणे कमी करण्यासाठी आणि वेगाने बरे होण्यासाठी घरच्याघरी घेऊ शकतात. यामुळे रुग्णालयांवरील भार कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच कमकुवत आरोग्यसेवा प्रणाली असलेल्या गरीब देशांमध्ये करोनाचा उद्रेक रोखण्यास मदत होऊ शकते. विशेषतः सौम्य ते मध्यम स्वरूपाची करोनाबाधा झालेल्या आणि ज्यांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते अशा प्रौढांसाठी मोलनुपिरावीरचा आपत्कालीन वापर करण्यास मंजुरी देण्याची मागणी औषध नियामकांकडे केली असल्याचे ‘मर्क’ने सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: