अंकुर सामाजिक कार्यकर्ते अंकुर जावीर यांची शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड
आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०२६/०९/२०२४- सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुर जावीर यांची शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
आपली शेतकर्यांप्रती असणारी तळमळ पाहता आपली शेतकरी संघटनेचे आटपाडी तालुकाध्यक्ष निवड करण्यात येत आहे. आपण शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल कराल ही अपेक्षा असे नियुक्तपत्र शेतकरी संघटनेचे शिवाजीराव रा.नांदखिले यांनी दिले आहे.
अंकुर जावीर यांच्या निवडीमुळे आटपाडी तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या नियुक्ती विषयावर बोलताना अंकूर जावीर यांनी सांगितले की शेतकरी संघटनेच्या वरिष्ठांनी दाखविलेल्या विश्वास तडा जाऊ देणार नाही आणि शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.