Adani Ports: इराण, पाक, अफगाणचा माल हाताळणार नाही; ‘अदानी पोर्ट’चा निर्णय


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

गुजरातमधील मुंद्रा बंदरात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आल्यानंतर अदानी पोर्ट्सने मोठे पाऊल उचलले आहे. यानुसार, १५ नोव्हेंबरपासून इराण, पाकिस्तान, अफगाणिस्तानमधून येणारा माल हाताळला जाणार नाही, असे अदानी पोर्ट्सने म्हटले आहे.

अदानी पोर्ट्स आणि लॉजिस्टिकने यासंदर्भात एक सूचना जारी केली आहे. इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून येणाऱ्या कंटेनरयुक्त कार्गोबाबत ही सूचना जारी करताना, १५ नोव्हेंबरपासून एपीएसईझेड इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून येणाऱ्या ‘एक्झिम’ कंटेनरकृत कार्गो हाताळू शकणार नाही, असे म्हटले आहे.

Terrorist Arrest: राजधानी दिल्लीत एके ४७, ग्रेनेडसहीत एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक
₹ ४,४४,४४,४४४ किंमतीच्या चलनी नोटांनी सजलं मातेचं मंदिर!
ही सूचना ‘एपीएसईझेड’द्वारे संचालित सर्व टर्मिनल्सना आणि त्रयस्थ टर्मिनल्ससह एपीएसईझेड बंदरांमध्ये पुढील सूचना येईपर्यंत लागू राहील. मुंद्रा बंदरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त केल्यानंतर ही सूचना जारी करण्यात आली आहे. हा साठा अफगाणिस्तानातून आला होता.

गुजरातमधील मुंद्रा बंदरात १३ सप्टेंबरला अदानी ग्रुपच्या दोन कंटेनरमधून सुमारे तीन हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. हा साठा अफगाणिस्तानातून आला होता आणि अफूच्या सर्वात मोठ्या बेकायदेशीर उत्पादकांपैकी एक होता. अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर अदानी ग्रुपने कंटेनरची निगराणी आणि तपासणी करण्याचा आम्हाला अधिकार नाही, असे म्हटले होते.

RTI Day: ‘आरटीआय’साठी लढणाऱ्यांना हवी सुरक्षा
देशात निर्णय घेणारे सरकार, पंतप्रधान मोदींनी स्वत:चीच पाठ थोपटली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: