डी. एस. कुलकर्णी यांच्या सील केलेल्या बंगल्यात चोरी; देवघरातल्या वस्तूही सोडल्या नाहीत!


हायलाइट्स:

  • डी एस कुलकर्णी यांच्या सील केलेल्या बंगल्यात चोरी
  • चोरट्यांनी सात लाखांचा ऐवज केला लंपास
  • चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी । पुणे

सेनापती बापट रस्त्यावरील डीएसके यांचा सील केलेल्या बंगल्यातून सात लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Theft at DSK’s Pune Bungalow)

याबाबत भाग्यश्री अमित कुलकर्णी (वय ३७) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०१९ ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रस्त्यावर डीएसके यांचा सप्तशृंगी नावाचा बंगला आहे. डीएसके यांच्यावर ठेवीदारांचे पैसे न दिल्याच्या आरोपावरून डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने डीएसके यांचा हा बंगला सील केला होता. तेव्हापासून हा बंगला बंद आहे. तक्रारदार यांना या बंगल्यात चोरी झाल्याचा संशय आला होता. त्यामुळे त्यांनी अधिकारी पोलिस आणि पंचांसमक्ष जाऊन बंगल्याची पाहणी केली. त्यावेळी बंगल्यातून टीव्ही, कॉम्प्युटर, कॅमेरा, एलईडी, गिझर, पिठाची गिरणी, देवघरातील चांदीच्या वस्तू असा सहा लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चतुश्रुंगी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा:

परमबीर सिंग यांचा निकटवर्तीय अटकेत; मोठा भांडाफोड होण्याची शक्यता

नागपूर हादरले! पोलिसांत तक्रार केली म्हणून शेजाऱ्याचा निर्घृण खूनSource link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: