बंदच्या दिवशी शिवसेनेच्या लोकांनी शेतकऱ्याची सफरचंद चोरून खाल्ली; नीलेश राणेंचा आरोप
वाचा: अंबरनाथ MIDC मध्ये वायूगळती; श्वास घेणंही झालं अवघड, प्रचंड घबराट
माजी खासदार नीलेश राणे यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडीवर तोफ डागली आहे. ‘तीन पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि काही ठिकाणी जेमतेम २५ % बंद दिसला. महाविकास आघाडीसाठी लाज वाटण्यासारखी ही गोष्ट आहे. सत्तेत असूनही जर १०० टक्के बंद होत नसेल तर तुमची काय लायकी आहे हे यावरून लक्षात येतं. सत्तेत नसता तर एक गल्ली सुद्धा बंद करण्याची धमक तुमच्यात नाही हे दिसलं असतं,’ अशी बोचरी टीका नीलेश राणे यांनी केली आहे.
शिवसेनेच्या लोकांनी सफरचंद चोरून खाल्ली!
‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये ही शिवाजी महाराजांची आज्ञा होती, पण बंदच्या दिवशी मालवणात शिवसेनेच्या दळिद्री पदाधिकाऱ्यांनी एका शेतकऱ्याचे सफरचंद चोरून खाल्ले,’ असा आरोपही नीलेश राणे यांनी काल रात्री केलेल्या ट्वीटमध्ये केला आहे. ‘काहीतरी लाज राखा… शिवाजी महाराज असते तर पाठीवर चाबकाचे कोरडे ओढले असते,’ असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.
वाचा: परमबीर सिंग यांचा निकटवर्तीय अटकेत; मोठा भांडाफोड होण्याची शक्यता