पोस्टल कर्मचारी करत असलेल्या अथक कामाबाबत लायन्स क्लब पंढरपूरच्यावतीने करण्यात आला त्यांचा सन्मान

लायन्स क्लब पंढरपूरच्यावतीने जागतिक टपाल दिन साजरा
 पंढरपूर - लायन्स क्लब ऑफ पंढरपूर व पंढरपूर हेड पोस्ट ऑफिस यांच्यावतीने जागतिक टपाल दिन साजरा करण्यात आला. भारतीय डाक विभाग हा जनसामान्यांसाठी अविरत सेवा देत असतो.कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही टपाल खात्याने अत्यंत महत्त्वाची सेवा दिली त्यासाठी तसेच 9 ऑक्टोंबर जागतिक टपाल दिन निमित्ताने पोस्ट ऑफिसमधील अधिकारी, पोस्टमन आणि पोस्टल कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल संतोष खुणे पोस्ट मास्तर, बी.के.मोहिते,एस.डी.रकटे,सोमनाथ गायकवाड, शिवाजी तोंडले,पोस्टमन रमेश भानावत,दत्ता कांबळे, गोपाल चव्हाण,अशोक वायदंडे,शुभम लंगोटे, गौरव कुलकर्णी, बाळू कोळी,पूजा नागटिळक, तुकाराम देशमुख,रतिलाल वाघमारे,हणमंत मलपे, राहुल मोहिते, शशिकांत आयतोडे,हेड पोस्टमन बाळासाहेब खंडागळे,सॉर्टींग पोस्टमन वैजिनाथ महामुनी यांना कृतज्ञता प्रमाणपत्र लायन्स क्लब संस्थेच्यावतीने देण्यात आली.

     सहाय्यक पोस्ट मास्तर सोमनाथ गायकवाड यांनी पोस्ट ऑफिसच्या स्थापनेपासून ते आज पर्यंतचा इतिहास सांगितला व पोस्ट ऑफिस करत असलेल्या कामांची माहिती दिली. पोस्टमास्तर संतोष खुणे यांनी पोस्ट ऑफिसने राबवलेल्या व राबवत असलेल्या योजनांची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य रा.पा.कटेकर यांनी केले. त्यांनी लायन्स क्लब करत असलेल्या सेवा कार्याची व पर्मनंट प्रोजेक्टची माहिती दिली .लायन्स क्लबचे अध्यक्ष विवेक परदेशी यांनी पोस्ट ऑफिसमधील अधिकारी,कर्मचारी देत असलेल्या अथक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यापुढेही पोस्ट ऑफिस कर्मचारी व समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी तोंडले यांनी केले . आभार सचिवा ललिता कोळवले यांनी मानले. या कार्यक्रमास अँड भारत वाघुले,मुन्नागीर गोसावी, कैलास करंडे, सुरेखाताई कुलकर्णी, सिमाताई गुप्ता,पोस्ट ऑफिसमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: