pakistani terrorist arrest : धक्कादायक! पाकिस्तानी दहशतवादी दिल्लीत १५ वर्षांपासून लपून होता, काय म्हणाले पोलीस?


नवी दिल्लीः राजधानी दिल्लीतील लक्ष्मी नगरमधून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला आज अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा दहशतवादी गेल्या १५ वर्षांपासून दिल्लीत राहत होता आणि तो सतत त्याच्या पाकिस्तानी म्होरक्याच्यां संपर्कात होता. अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव अशरफ उर्फ नूरी आहे. तो पाकिस्तानमध्ये बसलेल्या सूत्रधारांना माहिती पाठवत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पाकिस्तानी दहशतवादी अखेर जाळ्यात

पाकिस्तानी दहशतवादी अशरफने दिल्लीतच लग्न केले होते. पण, त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. चौकशीदरम्यान तो बरीच माहिती लपवतोय, असं सूत्रांनी सांगितलं. पोलीस अशरफला न्यायालयात हजर करणार आहेत.

दहशतवादी एक मोठी घटना घडवण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या पाकिस्तानी दहशतवाद्याकडून AK-47 रायफलसह अतिरिक्त मॅग्झिन, ६० जिवंत काडतुसं, एक हातबॉम्ब, ५० जिवंत काडतुसं आणि २ अत्याधुनिक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. सोमवारी रात्री ९.३० वाजता दहशतवाद्याला अटक केल्याचं बोललं जातंय.

राजधानी दिल्लीत एके ४७, ग्रेनेडसहीत एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात राहणारा मोहम्मद अशरफ उर्फ अली याने बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय ओळखपत्र मिळवले. तो एक भारतीय नागरिक म्हणून राहत होता. त्याच्याकडून एके -47 रायफल, इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे, असं दिल्लीचे पोलीस उपायुक्त (विशेष सेल) प्रमोद सिंह कुशवाह यांनी सांगितलं.

poonch encounter : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, ५ जवान शहीद

अशरफला बेकायदेशीर कारवाया, स्फोटकं आणि अवैध शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. नूरी उर्फ अशरफ नावाचा हा दहशतवादी दिल्लीतील पाकिस्तानी दहशतवादी स्लीपर सेलचा प्रमुख असल्याचं सांगण्यात येतंय. स्लीपर सेलचे प्रमुख म्हणजे पाकिस्तान समर्थित दहशतवादी जेव्हाही दिल्लीच्या आसपास कोणतीही घटना घडवण्याचा प्रयत्नात होते, तेव्हा ते नूरीशी संपर्क साधत होते, हे आतापर्यंत चौकशीतून समोर आलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: