बीजिंग: भारत आणि चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढला असताना दुसरीकडे चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने भारताला धमकी दिली आहे. चीनसोबत युद्ध झाल्यास भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागेल असे चीनने म्हटले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत चीन दरम्यान सुरू असलेली चर्चेच्या १३ व्या फेरीतही काहीच निष्पन्न झाले नाही.
‘ग्लोबल टाइम्स’ने भारताला धमकी देताना म्हटले की, सीमेवर भारताला हवी तशी स्थिती मिळेल असे वाटत असेल तर ते चूक आहे. मात्र, भारताने युद्ध सुरू केले तर त्यांना पराभवाचा सामना करावा लागेल. तर, ग्लोबल टाइम्सने चीन सरकारला सल्ला देताना म्हटले की, चीनने सीमा भागात शांतता ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायला हवेत. मात्र, त्याच वेळेस भारताविरोधात सर्व प्रकारच्या लष्करी संघर्षासाठी तयार राहिले पाहिजे.
अतिउंचावरील प्रदेशाची चीनला ‘बाधा’?; लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे निधन
तैवान आमचा अंतर्गत मुद्दा, इतरांनी लुडबूड करू नये; चीनची धमकी
ग्लोबल टाइम्सने भारताला संधीसाधू असेही संबोधले आहे. ग्लोबल टाइम्सने म्हटले की, चीन-अमेरिकेचे संबंध बिघडत असल्याने चीनला आपली आवश्यकता आहे, असे भारताला वाटते. मात्र, सीमा वाद हा देशाच्या प्रतिष्ठेशी निगडित असलेला मुद्दा आहे, असेही ग्लोबल टाइम्सने म्हटले.
तैवाननंतर चीनला या लहान देशाने दिला इशारा; राजदूताला बोलावणे धाडले
‘ग्लोबल टाइम्स’ने भारताविरोधात अन्य मुद्यांवरही आरोप लावले. चीन आपल्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी तयार आहे. गलवान खोरे हे त्याचे उदाहरण आहे. भारताला जर दीर्घकाळापर्यंत सीमाप्रश्नात अडथळे आणायचे असतील तर चीनदेखील तयार असल्याचे ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले.