खाजगी हाॅस्पिटल चा नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारी वर्ग समान काम किमान वेतन व इतर मागण्यांबाबत आक्रमक

खाजगी हाॅस्पिटलमधील नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग समान काम किमान वेतन व ईतर मागण्यांबाबत आक्रमक….

जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार . व्हाटसअप – ९७६८४२५७५७

परळी वैजनाथ ,जि. बीड: भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया यांच्या वतीने आज महाराष्ट्रातील विशेषत (मराठवाडा व विदर्भ) संघटित व असंघटित सर्व खाजगी हाॅस्पिटल मधील तसेच शासकीय हाॅस्पिटल मधील कंञाटी नर्सिंग स्टाफ व संबधित कामगार तसेच परळी तालुक्यातील व बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल मधील ,नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ होलसेल व चिल्लर मेडिकल वर काम करणारे कर्मचारी लॅबोरेटरी मध्ये काम करणारे कर्मचारी संबंधित खाजगी (कंत्राटी) हॉस्पिटल मधील काम करणारी आरोग्य सेवेतील कर्मचारी वर्ग तसेच, साफसफाई कामगार, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांना शासकीय नियमानुसार किमान वेतन ईपीएफ, बँकेत पगार ,आरोग्य विमा पॉलिसी बायोमेट्रिक उपस्थिती, आठ तास कामाची वेळ ,टाईम बोनस व अन्य शासकीय नियमानुसार सवलती मिळणे नाहीतर खाजगी हॉस्पिटलची वरील सर्व बाबींची तपासणी होत नाही.शासकीय नियमानुसार मोबदला, समान काम किमान वेतन, ईपीएफ वीमा संरक्षण व इतर सवलती मिळत नाहीत. तरी शासनाने लवकरात लवकर या सर्व खाजगी हाॅस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी सर्व खाजगी हॉस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, मेडिकल स्टाफ, लॅबोरेटरीमधील स्टाफ, सफाई कामगार या सर्वांचा मोर्चा आज परळी तालुक्यातील तहसीलदार कार्यालयावर व उपजिल्हा रुग्णालयावर धडकला.

या मोर्चामध्ये सर्व नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग, पदाधिकारी तसेच अनेक नर्सिंग संघटना, कामगार संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.ॲड.मनोज संकाये,श्रीकांत पाथरकर,दत्ता दहिवाळ,बहाद्दूर भाई, उत्तमराव माने ,सोमनाथ गिते सर,महेश मुंडे विश्वजित कांबळे ,गणेश कराड, शेख अखिल ,पटेल सर,मुस्तफा पठाण शेख सानिया, शेख अंजुम, गिरी , ज्ञानेश ईरापल्ले ,छाया सूर्यवंशी, शेख नजिरा,रमेश ताल्डे आत्माराम गुट्टे ,प्रमोद माने,तिरूपती मुंडे, सुनिल साबळे सागर बचाटे,शुभम सोळंके,कालिंदा कसबे मॅडम, बापु गावडे ,शशीकांत कराळे, बाबा पोटभरे ,प्रदिप बोबडे, गौतम साळवे, सर,कोयला भाई व इतर कर्मचारीवर्ग मोर्चा मध्ये सहभागी होते .याचे आयोजन अनिल जायभाये बीडकर यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: