पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघातील नवनिर्वाचित सदस्यांना उप सभापतींकडून विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघातील नवनिर्वाचित सदस्यांना मा.उप सभापतींकडून विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई, दि.08 फेब्रुवारी (ज्ञानप्रवाह न्यूज ) : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171(3)(ख) अन्वये, महाराष्ट्र विधानपरिषदेवर पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित सदस्य सत्यजीत सुधीर तांबे, नाशिक विभाग पदवीधर व धीरज रामभाऊ लिंगाडे, अमरावती विभाग पदवीधर तसेच भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171(3)(ग) अन्वये, महाराष्ट्र विधानपरिषदेवर शिक्षक मतदार संघातील नवनिर्वाचित सदस्य विक्रम वसंतराव काळे, औरंगाबाद विभाग शिक्षक, सुधाकर गोविंदराव अडबाले, नागपूर विभाग शिक्षक व ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे, कोकण विभाग शिक्षक अशा एकूण पाच सदस्यांनी आज दिनांक 08 फेब्रुवारी, 2023 रोजी मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे यांचेकडून विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.

विधान भवन, मुंबई येथे झालेल्या या शपथविधी समारंभाच्यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, महाराष्ट्र विधानसभा सदस्य अशोक चव्हाण, जयंत पाटील, अमिन पटेल, बालाजी किणीकर,अनिल पाटील, किशोर जोरगेवार, महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य अभिजीत वंजारी, विधानसभा माजी सदस्य विजय गव्हाणे तसेच विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, निर्वाचित सन्माननीय सदस्यांचे स्नेही, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: