प्रतिकूलतेवर मात करत माणसांच्या जीवनाच सोनं करणारा परिस म्हणजे वसंतदादा काळे -सुधाकर कवडे
प्रतिकूलतेवर मात करत माणसांच्या जीवनाच सोनं करणारा परिस म्हणजे वसंतदादा काळे -सुधाकर कवडे
प्रतिकूल परिस्थितीवर प्रभावी इच्छाशक्तीने मात करून सहवासात आलेल्या माणसांच्या जीवनाच सोनं करणारा परिस म्हणजे सहकार शिरोमणी वसंतदादा काळे होते असे प्रतिपादन सहकार शिरोमणीचे संचालक सुधाकर कवडे यांनी केले.ते वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडीकुरोली येथे आयोजित सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या ७९ व्या जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याण काळे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे होते. यावेळी संचालक महादेव नाईकनवरे, वसंतदादा मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर शिनगारे , रायझिंग स्टार पब्लिक स्कूलच्या प्राचार्या गीतांजली खाडे, बाळासाहेब काळे उपस्थित होते.
पुढे बोलताना कवडे म्हणाले की ध्येय निश्चित असेल विद्यार्थ्यांना यशाची शिखरे गाठता येतात यासाठी विद्यार्थ्यांनी वसंतदादांच्या जयंती निमित्त प्रचंड इच्छाशक्ती, ध्येयनिष्ठा व अविरतपणे काम काम करण्याचा दादांचा गुण घेऊन कष्टातून आपले जीवन यशस्वी करावे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बाळासाहेब काळे यांनी वसंतदादांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात चांगली संगत व सुसंस्काराची शिदोरी ही आत्मसात करून आजच्या युवा पिढीने आपले जीवन घडवणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दादासो खरात यांनी केले . सूत्रसंचालन प्रा. समाधान काळे यांनी केले. आभार प्रदर्शन सहशिक्षक संजय कुलकर्णी यांनी केले.