भारत व ऑस्ट्रेलियातील कसोटी सामना सकाळी नेमका किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ


नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच वाद सुरु झाले आहेत. त्यामुळे या कसोटी सामन्यांमध्ये नेमकं काय घडणार, याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे. पण भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामने आता सकाळी ८.३० वाजता नाही तर किती वाजता सुरु होणार आहेत, याची माहिती समोर आली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वीच त्याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली आहे. त्यामुळे हा कसोटी सामना नेमका कधी सुरु होणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. कारण कसोटी सामन्यासाठी पहिले सत्र महत्वाचे असते. कारण पहिल्या सत्रात कोणता संघ चांगली कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. पहिल्या सत्रात खेळपट्टीर दव जास्त असते, त्यामुळे वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळत असते.

भारतामध्ये काही वेळा कसोटी सामने हे लवकर सुरु केले जायचे. हे सामने सकाळी ८.३० वाजताही सुरु व्हायचे. पण हे कसोटी सामने मात्र एवढ्या लवकर सुरु होणार नाहीत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेसाठी पंच सकाळी ८.०० वाजता मैदानात दाखल होतील आणि ते मैदानाची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी ९.०० वाजता टॉस केला जाईल. टॉस झाल्यावर दोन्ही कर्णधार आपला संघ जाहीर करतील. त्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंना तयार होण्यासाठी काही वेळ दिला जाईल. त्यानंतर टॉस झाल्याच्या अर्ध्या तासानंतर म्हणजेच सकाळी ९.३० वाजता सामना सुरु होणार आहे. त्यामुळे सकाळी ९.०० वाजल्यापासून चाहत्यांना क्रिकेटचे सर्व अपडेट्स महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमवर मिळू शकतील.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सध्याच्या घडीला चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. कारण नागपूर कसोटी सुरु होण्यापूर्वीच खेळपट्टीचा वाद सुरु झाला आहे. त्यामुळे या सामन्यात खेळपट्टी नेमकी कशी असेल, याची उत्सुकता आता चाहत्यांना असणार आहे. त्याचबरोबर या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: