टाटांचे बिझनेस पार्टनर बनायचे आहे? फक्त १० हजार रुपयांची गुंतवणूक, होईल बक्कळ कमाई


नवी दिल्ली : देशातील आरोग्य क्षेत्रात सुरुवातीपासून मोठी प्रगती होत असून यामध्ये पैसे गुंतवणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीने मोठी कमाई केली आहे. जर तुम्ही नोकरी शोधात आहात किंवा तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल, तर येथे आम्ही तुम्हाला एक युक्ती देणार आहोत, जेणेकरून तुम्ही सहज तुमचा व्यवसाय सुरु करून चांगली कमाई करू शकता. तुम्ही देखील वेगाने वाढणाऱ्या या आरोग्य क्षेत्राचा भाग बनू शकता. देशातील प्रतिष्टीत टाटा समूह तुम्हाला संधी देत आहेत. टाटा समूहातील एक कंपनी त्यांच्या सोबत व्यवसाय करण्याची संधी देत आमंत्रित करत आहे.

टाटा डिजिटल ऑनलाइन फार्मसी 1mg च्या नावाने आपला व्यवसाय देशभर पसरवत आहे. टाटा समूहाच्या या ऑनलाईन फार्मसी कंपनीने आरोग्याशी संबंधित एक कार्यक्रम सुरु केला आहे. याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.

Business Idea: अवघ्या ५० हजारात सुरु करा ५ लाखांचा बिझनेस, होईल लाखोंची कमाई; जाणून घ्या कसं ते
टाटाच्या व्यवसायात व्हा भागीदार!
टाटा १MG देशभरात आपला विस्तार करू पाहत आहे. अशा स्थितीत तुम्ही त्याची फ्रँचायझी घेऊन जोरदार कमाई करू शकता. यासाठी कंपनीने एक कार्यक्रम सुरु केला असून याद्वारे तुम्ही टाटा समूहाचे भागीदार होऊ शकता. सध्याच्या काळात फ्रँचायझी घेऊन व्यवसाय सुरू करणे एक चांगली कल्पना असल्याचे सिद्ध होतेय आणि हजारो लोक या बिझनेस आयडियाने चांगली कमाई देखील करत आहेत.

टाटा समूहाचा कार्यक्रम
टाटा समूहाने ‘सेहत के साथी’ हा कार्यक्रम सुरू केला असून हा एक लीड जनरेशन प्रोग्राम आहे. या प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला एक क्षेत्र दिले जाईल जिथे तुम्हाला १MG साठी नवीन ग्राहक शोधावे लागतील. अशा प्रकारे, तुम्ही कंपनीसोबत जितके जास्त ग्राहक जोडाल तितके जास्त कमिशन तुम्हाला मिळेल.

Money Making Idea: दरमहा ७५ हजार रुपये कमावण्याची संधी, कसं जाणून घ्या…
कितीची गुंतवणूक करायची?
तुम्ही देखील टाटा समूहासोबत काम करायचे असेल तर त्यासाठी १० हजारांची गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे इतक्या छोट्या गुंतवणुकीत तुम्हाला टाटाची फ्रँचायझी दिली जाईल. १० हजाराची गुंतवणूक केल्यावर तुम्हाला ब्लड प्रेशर चेकिंग मशीन, शुगर चेकिंग मशीन आणि ५०० व्हिजिटिंग कार्ड्स अशा तीन वस्तू दिल्या जातील. तुम्हाला मिळणारे कमिशन सामान्यतः मूल्याच्या १०% असते. सध्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, टाटा १MG च्या या कार्यक्रमात १०० हून अधिक लोक सामील झाले आहेत.

Money Making Idea: अगदी कमी खर्चात ‘या’ व्यवसायात हात आजमावा, मंदीतही भरपूर पैसे कमवाल
अर्ज कसा करायचा?
तुम्हाला देखील टाटाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही आधी त्यांच्या वेबसाईटवर (1mg.com/sehatkesathi) जा. येथे ‘लीड जनरेशन पार्टनर’ च्या खाली ‘क्लिक हेअर’ वर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन गुगल डॉक्युमेंट ओपन होईल, ज्यामध्ये तुम्ही तुमची माहिती भरायची. तसेच मदतीची गरज पडल्यास [email protected] ई-मेल करून मदत मिळवू शकता.

किती होईल कमाई
सध्याच्या काळात ऑनलाईन फार्मसीचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. भारताचा ई-फार्मसी व्यवसाय २०२३ पर्यंत $२.७ अब्जपर्यंत जाऊ शकतो, जो सध्या सुमारे १७ हजार कोटी रुपये आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: