पंढरपूर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी-आ.प्रशांत परिचारक यांचे आवाहन

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने शहरांमधील सर्व भागांमध्ये लसीकरण मोहीम सुरू
  पंढरपूर / नागेश आदापूरे ,१२/१०/२०२१ - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असे आवाहन पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने मुख्याधिकारी अरविंद माळी,नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले, उपनगराध्य सौ श्वेता डोंबे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी केले आहे. 

   यामुळे पंढरपूर शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी 1)अरीहंत पब्लिक स्कूल,मनीषा नगर 2) आदर्श प्राथमिक विद्यालय, भक्ती मार्ग 3) कर्मयोगी विद्या निकेतन प्रशाला, लिंक रोड4) नगरपरिषद प्राथमिक शिक्षण मंडळ शाळा नंबर 7, संतपेठ 5) लोकमान्य विद्यालय, नवरंगे बालकाश्रम जवळ,6) नगरपरिषद दवाखाना, काळा मारुती जवळ 7) सोन्या मारुती चौक, दाळे गल्ली 8) कवठेकर प्रशाला, नाथ चौक 9) नगरपरिषद दवाखाना, गोविंदपुरा या 9 ठिकाणी लसीकरण केंद्र करण्यात आले होते .

या लसीकरण केंद्रांना आमदार प्रशांत परिचारक यांनी भेट दिली यावेळी ज्या ठिकाणी लसीकरण चालू आहे त्या भागातील माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, नगरसेवक विक्रम शिरसट, सामाजिक कार्यकर्ते महादेव आदापुरे,ऋषिकेश आदापुरे, नगरसेवक वामन बंदपट्टे ,संजय निंबाळकर, राजू सर्वगोड व मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, सामाजिक कार्यकर्ते बसवेश्वर देवमारे आदी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले की ,शहरातील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण होण्याच्या दृष्टीने त्या भागातील नगरसेवक व सार्वजनिक गणपती मंडळे, सामाजिक संस्था यांना लसीकरण मोहीम मध्ये सहभागी होण्याबाबत नगरपरिषदचेवतीने नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत शहरातील प्रभागातील नगरसेवक व सार्वजनिक गणपती मंडळे सामाजिक संस्था यांनी चांगला सहभाग नोंदवला आहे. त्यानुसार नगरपरिषदेने त्यांना लस उपलब्ध करून दिली आहे. तरी शहरातील नागरिकांनी या संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त लसीकरण मोहिमेस प्रतिसाद द्यावा व याकामी शहरातील सर्व नगरसेवक, सार्वजनिक गणपती मंडळे अथवा सामाजिक संघटना यांनीही याबाबत पुढाकार घ्यावा व आपले शहर कोरोनामुक्त राहण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: