ncp vs bjp: भाजप, केंद्र सरकारच्या एजन्सींच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढणार; राष्ट्रवादी आक्रमक
हायलाइट्स:
- राष्ट्रवादी काँग्रेस भाजप, केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणांविरोधात पूर्ण ताकदीने लढणार- राष्ट्रवादी.
- भाजप महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक नेत्यांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास देण्याचे काम करत आहे- राष्ट्रवादी.
- केंद्रीय एजन्सींचा आमच्या विरोधात कितीही वापर केला तरी आमचे नेते किंवा कार्यकर्ते डगमगणार नाहीत- नवाब मलिक.
या बैठकीनंतर नवाब मलिक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. आज राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती ठरल्यानंतर नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील नव्या शहराचं भाजपनं ठरवलं ‘हे’ नाव अन् दर्जाही
यावेळी बैठकीत भाजपच्या कारवायांवर मोठी चर्चा झाली. आयकर विभाग, ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय एजन्सींचा वापर करून भाजप महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक नेत्यांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास देण्याचे काम करत आहे. यामुळे या सर्व गोष्टींना खंबीरपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
केंद्रसरकारने किंवा भाजपने कितीही राष्ट्रवादीवर हल्ले केले किंवा केंद्रीय एजन्सींचा वापर केला तरी आमचे नेते किंवा कार्यकर्ता डगमगणार नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज नव्या रुग्णांची संख्या पुन्हा २ हजारांवर; मृत्यूही वाढले
नवाब मलिकांचा फडणवीसांना जोरदार टोला
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री नाही असे मला वाटतच नाही, असे विधान केले आहे. या विधानावर नवाब मलिक यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपण मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाकायला हवे. कारण विरोधी पक्षनेतेपदही तितकेच मोठे आणि महत्वाचे पद आहे, असे मलिक म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- शिवसेनेचा दसरा मेळावा; रामदास कदम यांना बोलावलं असेल का?, रंगली चर्चा