टपाल विभागाने सीमाशुल्क विभागाच्या सहकार्याने केली विशेष हेल्पलाईन सुरु

कोविड संबंधित आपत्कालीन पार्सलच्या जलद पुरवठ्यासाठी टपाल विभागाने सीमाशुल्क विभागाच्या सहकार्याने केली विशेष हेल्पलाईन सुरु Special helpline launched by the Postal Department in collaboration with the Customs Department for expeditious delivery of emergency parcels related to Kovid

नवी दिल्ली, 7 मे 2021 – कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु असतांनाच, टपाल विभागाने सीमाशुल्क विभागाशी समन्वय साधत, कोविड संबंधित, ऑक्सिजन काँसंट्रेटर, उपकरणे आणि औषधांच्या परदेशातून होणारा पुरवठा जलद गतीने व्हावा, याची व्यवस्था केली आहे. या संदर्भात एक सार्वजनिक सूचनाही टपाल विभागाने जारी केली आहे.

या सार्वजनिक सूचनेनुसार, भारतातील कोविड रुग्णांना मदत व्हावी म्हणून परदेशातून पाठवलेल्या अशा स्वरुपाच्या सामानाचा पुरवठा टपाल विभागाच्या ग्राहकांना आणि इतर सार्वजनिक संस्थांना लवकरात लवकर व्हावा, या उद्देशाने, टपाल विभागाने एक हेल्पलाईन सुरु केली आहे. अशी मदत पाठवलेले ग्राहक टपाल विभागाशी संपर्क साधून त्यांच्या पार्सलची आणि त्यांची सविस्तर माहिती ( नाव, मोबाईल क्र., ईमेल, ट्रॅकिंग क्रमांक इत्यादी) [email protected] किंवा [email protected] या दोन ईमेलवर पाठवू शकतात किंवा खालील नोडल अधिकाऱ्यांना व्हॉटसऐप वर ही माहिती पाठवू शकतात. त्यांनी पाठवलेले समान त्यानंतर जलदरित्या इच्छित स्थळी पोचवले जाईल.

नोडल अधिकाऱ्यांची नावे :

अरविंद कुमार – 9868378497
पुनीत कुमार – 9536623331

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: