PM Modi: ‘मोदींच्या बदनामीचा सुनियोजित कट रचला जातोय’; भाजपचा आघाडीवर आरोप
क्लिक करा आणि वाचा- पाक, यूपीतील हॅकर्सनी केला पोलिस अधिकाऱ्याचा ईमेल हॅक; सरकारी खात्यांमध्ये खळबळ
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या कोअर कमिटीची बैठक आज भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला केंद्रीय प्रभारी सि.टी. रवी, पक्षाचे केंद्रीय संघटन मंत्री शुक्ला, सह प्रभारी पवय्या, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली. त्यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, संघटन मंत्री श्रीकांत भारतीय, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि सर्व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा आणि लेखाजोखा घेण्यात आला.
क्लिक करा आणि वाचा- भाजप, केंद्र सरकारच्या एजन्सींच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढणार; राष्ट्रवादी आक्रमक
राज्यात येत्या काही महिन्यांमध्ये जवळजवळ २७४ नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, खरेदी-विक्री संघाच्या, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत . त्यामुळे त्यांची पूर्ण रचना आम्ही केली असून, या निवडणुकांसाठी शत-प्रतिशत भाजपा हाच आमचा नारा असेल, असे शेलार यांनी सांगितले. तिघाडीतील तिघांनी मिळून यावे, आपापसात पायात पाय घालून यावे, या निवडणूका जिंकण्यासाठीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. त्यासाठी आवश्यक व्यक्ती, परिवार, संघटना याबाबतच्या योजना आमच्या तयार आहेत. दिवाळीच्या नंतर एक चिंतन बैठक आमची होईल, असेही ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील नव्या शहराचं भाजपनं ठरवलं ‘हे’ नाव अन् दर्जाही