नेपाळ: प्रवासी बस नदीत कोसळली; २८ जणांचा मृत्यू


काठमांडू: नेपाळच्या मुगू जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या बस अपघातात २८ जण ठार झाले आहेत. तर, १६ जण जखमी झाले आहेत. मुगू जिल्ह्यातील गमगाधीकडे येणारी ही बस पिना झ्यारी नदीत कोसळली. हा अपघात छायानाथ रारा नगरपालिका भागात झाला.

बसमधील बहुतांशी प्रवासी हे दुर्गा पूजेनिमित्त विविध ठिकाणांहून आपल्या घरी परतत होते. अपघाताची माहिती समजताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. सुरखेत येथून नेपाळी सैन्याचे हेलिकॉप्टर या ठिकाणी बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले. मुगू जिल्हा हा काठमांडूपासून ६५० किलोमीटर दूर आहे.

मुगू जिल्हाधिकारी रोम बहादूर महत यांनी सांगितले की, करनाली प्रांतात मुगू जिल्ह्यात पिना गावात झालेल्या अपघात २४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, चार जणांना रुग्णालयात दाखल करत असताना त्यांना मृत घोषित करण्यात आले. अपघातग्रस्त बसमध्ये कर्मचाऱ्यांसह ४२ जण होते.

महागाईने जनता त्रस्त; मंत्री म्हणतात, लोकांनी कमी खावं!

लैंगिक संबंधादरम्यान संमतीशिवाय निरोध काढण्यास बंदी ; चर्चेत आहे ‘हा’ कायदा

जखमी प्रवाशांपैकी १४ जणांना हेलिकॉप्टर आणि नियमित उड्डाणांच्या माध्यमातून नेपाळगंज येथे पाठवण्यात आले. मृतांमध्ये विद्यार्थी आणि श्रमिकांची संख्या अधिक आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बसचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. टायर फुटल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही बस दरीतून नदीत कोसळली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: