IPL फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध कोण लढणार? आज होणार फैसला


शारजा: पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या दिल्ली संघाची आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज (बुधवार) क्वालिफायर-२ लढतीत कोलकाता संघाविरुद्ध लढत होत आहे. यातील विजेता संघ अंतिम फेरीत दाखल होईल. चेन्नईने यापूर्वीच अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे.

वाचा- भारतीय क्रिकेटपटूला पुढील आदेश मिळेपर्यंत UAE न सोडण्याचे आदेश; जाणून घ्या कारण

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने यंदाच्या मोसमात कामगिरीत सातत्य राखून साखळीत अव्वल क्रमांक पटकाविला. मात्र, क्वालिफायर-१ लढतीत चेन्नईने दिल्लीला अंतिम फेरीत पोहोचण्यापासून रोखले. अर्थात, अंतिम फेरीसाठी दिल्लीला आणखी एक संधी मिळणार आहे. त्यासाठी त्यांना इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघाचा अडथळा पार करावा लागणार आहे. कोलकाता संघाने एलिमिनेटर लढतीत बेंगळुरू संघावर मात केली आहे. या विजयामुळे आत्मविश्वास ऊंचावलेला कोलकाता संघ दिल्लीसमोर कडवे आव्हान निर्माण करु शकेल.

वाचा- #Fixerkings चेन्नई सुपर किंग्जवर फिक्सिंगचा आरोप; सोशल मीडिायवर राडा सुरू

ऑस्ट्रेलियाचे रिकी पाँटिंग प्रशिक्षकपदावर आल्यापासून दिल्लीचे रंग बदलले आहेत. दिल्लीचा संघ २०१९मध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. गेल्या मोसमात दिल्लीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता दिल्ली संघ जेतेपदासाठी उत्सुक आहे. दिल्लीने यंदाच्या मोसमात साखळीत त्याच थाटात सुरुवात केली. विजेत्या संघाला आवश्यक सारे ‘पॅकेज’ त्यांच्याकडे आहे. अमीरातीत सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यात दिल्लीने पाच लढती जिंकल्या असून, केवळ एका लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. विशेष म्हणजे हा एकमेव पराभव कोलकात्याविरुद्ध आहे. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी दिल्ली संघ उत्सुक आहे.

वाचा- मुंबई इंडियन्स घेणार मोठा निर्णय; या खेळाडूंना मिळणार डच्चू!

कोलकाता संघाने साखळीत सरस नेट रनरेटच्या जोरावर बाद फेरी गाठली. बाद फेरीत बेंगळुरूविरुद्ध त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. कोलकाताची फलंदाजी आठव्या क्रमांकापर्यंत सखोल आहे. त्यांचे गोलंदाजही चांगल्या लयमध्ये आहेत. अष्टपैलू आंद्रे रसेल दुखापतीतून सावरून दिल्लीविरुद्ध खेळणार, असे वाटत आहे. तेव्हा या आत्मविश्वासाच्या जोरावर कोलकाता संघ दिल्लीला रोखणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

आमनेसामने

२८ टी-२०

१२ दिल्लीचे विजय

१५ कोलकाताचे विजय

१ अनिर्णित

साखळीतील कामगिरी

दिल्ली- १४ सामने, १० विजय, ४ पराभव

कोलकाता- १४ सामने, ७ विजय, ७ पराभव

सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० पासून

स्थळ :
शारजा क्रिकेट स्टेडियम

दिल्ली : अव्वल चार फलंदाज – शिखर धवन (५५१ धावा), पृथ्वी साव (४६१), ऋषभ पंत (४१३), शिमरॉन हेटमायर (२२५). अव्वल चार गोलंदाज – आवेश खान (२३ विकेट), अक्षर पटेल (१५), कॅगिसो रबाडा (१३), अॅनरिक नॉर्किया (१०).

कोलकाता :
अव्वल चार फलंदाज – राहुल त्रिपाठी (३८३ धावा), शुभमन गिल (३८१), नितीश राणा (३७०), वेंकटेश अय्यर (२६५). अव्वल चार गोलंदाज – वरुण चक्रवर्ती (१६ विकेट), सुनील नारायण (१४), लॉकी फर्ग्युसन १२), प्रसिध कृष्णा (१२).Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: