‘त्या तक्रारींचे पुढे काय झालं’?; राष्ट्रवादीची सोमय्यांविरोधात बॅनरबाजी


मुंबईः भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) सातत्याने महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर आरोप करत आहेत. मंत्री अनिल परब, अनिल देशमुख आणि हसन मुश्रीफ यांच्यासह आघाडीतील मंत्र्यांवर सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. किरीट सोमय्यांच्या या आरोपसत्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही आता आक्रमक झाली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोमय्या जवाब दो ही मोहिम सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने किरीट सोमय्यांच्या विरोधात मुंबईत बॅनर झळकावले आहेत. गेल्या काही वर्षात सोमय्यांनी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या आरोपांचे पुढे काय झाले?, असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे.

वाचाः मुंबईत जळीतकांड; पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या २० दुचाकी जळून खाक

मुंबई मंत्रालयात आणि आसपासच्या परिसरात राष्ट्रवादीकडून हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनरवर किरीट सोमय्या जवाब दो, असा मजकूक लिहला असून नारायण राणे, कृपा शंकर सिंह, विजयकुमार गावित आणि बबनराव पाचपुते यांच्यावर भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सोमय्यांनी तशी तक्रार देखील दाखल केली होती. आता या नेत्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जुन्या तक्रारींविषयी काय झाले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.

वाचाः प्रियांका गांधी पुण्याच्या घटनेवर गप्प का?; चित्रा वाघ यांचा संतप्त सवालSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: