जनकल्याण हॉस्पिटल अंतर्गत कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

जनकल्याण हॉस्पिटल अंतर्गत 200 बेडच्या कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन Guardian Minister Dattatraya Bharane inaugurates covid Care Center under Janakalyan Hospital
    पंढरपुर,(प्रतिनिधी),दि.08- कोरोना रुग्णांची संख्या पंढरपूर तालुक्यात वेगाने वाढत असल्याने ऑक्सीजन बेड आणि हॉस्पिटलमध्ये उपचारा साठी जागा शिल्लक नाही,तो ताण कमी करण्या साठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भक्त निवास उपलब्ध करून दिल्याने जनकल्याण हॉस्पिटल अंतर्गत जनकल्याण कोविड केअर सेंटरचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. 

वेदांत भक्त निवास पंढरपूर येथे हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, जनकल्याण हॉस्पिटलचे मार्गदर्शक कल्याणराव काळे,विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके,मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे,ज्ञानेश्वर महाराज जळगावकर,शकुंतला नडगिरे,dvp उद्योगचे अमर पाटील, प्रांताधिकारी सचिन ढोले,पंढरपूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले,मंदिर समिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, वसंतदादा मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर शिनगारे, युवा गर्जनाचे समाधान काळे उपस्थित होते.

राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट पंढरपुरात
  यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, प्राथमिक स्तरावरच कोरोना रुग्णांची तपासणी करून प्राथमिक उपचार करण्यासाठी राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून जनकल्याण कोविड केअर सेंटर सुरू होत आहे. हा प्रयोग  दिशादर्शक ठरेल .विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने जागा उपलब्ध करून दिल्याने अतिरिक्त दोनशे बेड उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे पंढरपुरातील हॉस्पिटल व ऑक्सिजन बेडवरचा ताण कमी होण्यासाठी मदत होणार आहे .

यावेळी कल्याणराव काळे म्हणाले की,राज्यासह पंढरपूर तालुक्यात ऑक्सिजन पुरवठा कमी होत असल्याने हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन बेड उपलब्ध नाहीत त्यामुळे प्राथमिक स्तरावर या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून औषध उपचार व रुग्णांचे विलगीकरण केल्याने रुग्णांचा पुढील धोका कमी होणार असून दर्जेदार सोयीसुविधा औषधोपचार व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक स्तरावरच कोरोना रुग्णांना औषध उपचार होणार असल्याने रुग्ण प्राथमिक स्तरावरच बरे होण्यासाठी या कोविड केअर सेंटरची मदत होणार आहे .पंढरपूर शहरासाठी 100 व ग्रामीण भागासाठी 100 असे 200 बेडचे कोविड केअर सेंटर उभा केले असून त्यामुळे रुग्णांची सोय होणार आहे .

     यावेळी पंढरपूर तालुक्यातील हॉस्पिटलला ऑक्सिजन रेमडीसीवर इंजेक्शन व लस उपलब्ध व्हावी म्हणून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना कल्याणराव काळे यांनी निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: