स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक जयंतीनिमित्त अक्षय वाडकर मित्र परिवारातर्फे विविध कार्यक्रम

स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक जयंतीनिमित्त अक्षय वाडकर मित्र परिवारातर्फे विविध कार्यक्रम
पंढरपूर - सहकारतपस्वी माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या ८६ व्या जयंती निमित्त आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली आणि युवक नेते प्रणव परिचारक , युवा नेते रोहन परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय वाडकर मित्र परिवारातर्फे प्रभाग क्रमांक ६ मध्ये दिनांक १२ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत सेवा सप्ताह चे आयोजन केले आहे. आज पहिल्या टप्प्यातील रक्तदान शिबीरात ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिराला आ. प्रशांत परिचारक, प्रणव परिचारक, रोहन परिचारक, सुभाष मस्के यांनी भेट दिली. तसेच आज वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी प्रभाग क्रमांक ६ मधील सर्व नगरसेवक आणि सर्व प्रतिष्ठित मान्यवर, नागरिक, जेष्ठ मार्गदर्शक आणि तरुण सहकारी उपस्थित होते.

सहकारतपस्वी माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या ८६ व्या जयंती निमित्त आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली आणि युवक नेते प्रणव परिचारक , युवा नेते रोहन परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय वाडकर मित्र परिवारातर्फे आमच्या परिवाराच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती अक्षय वाडकर यांनी दिली.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: