ऋषिकेश आदापुरे मित्र परिवारातर्फे विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन

ऋषिकेश आदापुरे मित्र परिवारातर्फे विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन

 पंढरपूर /नागेश आदापुरे-  दिनांक१/१०/२०२१ रोजी येथील कवठेकर प्रशाला, नाथ चौक येथे ऋषिकेश आदापुरे D.A.GROUP मित्र परिवारा तर्फे सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते विशेष लसीकरण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.   

यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी अधिकारी सुनील वाळुजकर , महादेव आदापुरे हे उपस्थित होते. श्रीनाथ चौक तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दत्तात्रेय आदापुरे यांच्या आशीर्वादाने हा D.A. ग्रुप पुढे वाटचाल करत असून या ग्रुपच्यावतीने कोरोना काळामध्ये गरजूंना अन्नदान, रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रिक्षा तसेच रक्तदान शिबिर, लसीकरणाच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णास वैद्यकीय सेवेबद्दल योग्य मार्गदर्शन उपचाराबाबत व हॉस्पिटलबाबत माहिती मदत पुरवण्याचे काम D.A ग्रुप तर्फे आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली करत असल्याची माहिती ऋषिकेश आदापुरे यांनी दिली.

 यावेळी मित्र परिवारासह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: