कोरोनामुक्त गावासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – डॉ.अनुजा शेडगे

क्षकोरोनामुक्त गावासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – डॉ.शेडगे Public participation important for corona mukta village – Dr.Shedge
  पंढरपूर,प्रतिनिधी- गावातील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी कोविड सेंटर उभारण्यात येत असून आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण व कोरोना तपासणी सुरू आहे.या सर्व गोष्टींची अंमलबजावणी होऊन गाव कोरोनामुक्त होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुजा शेडगे यांनी केले.

पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन सरपंच शशिकला चव्हाण व डॉ.अनुजा शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी डॉ.हनुमंत खपाले,डॉ.महावीर शहा,डॉ. रत्नाकर मुळे,डॉ.प्रसाद तोडकरी,ग्रामपंचायत सदस्य अनिल कदम,उषा शेडगे,बालाजी भोसले, प्रदीप भोसले, जनसेवा संघटनेचे अशोक पाटोळे, ग्रामसेवक नवले,दत्ताभाऊ भोसले,अशोक शेडगे, विकास आदमिले, किशोर काकडे, रोहित कदम यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

 पुढे बोलताना डॉ.शेडगे म्हणाल्या,नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन प्रशासनाच्या कोरोना काळातील कामकाजास सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

 डॉ.हनुमंत खपाले आणि अशोक पाटोळे यांनी गावातील डॉक्टरांच्या कार्यामुळे कोरोनाशी यशस्वी लढाई सुरू असून त्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी शासनाचे कोरोनाबाबतचे नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: