स्टार फुटबॉलपटू नेमारला नेमकं झालंय तरी काय, घेतला धक्कादायक निर्णय


ब्राझिलिया : ब्राझीलच्या फुटबॉल संघातील खेळाडूंनी पुढील वर्षी कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषकानंतरही संघ सहकारी नेमारला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये राहण्याचा आग्रह केला आहे. नेमारने या आठवड्याच्या सुरुवातीला दिलेल्या मुलाखतीवेळी म्हटले होते की, आगामी २०२२ विश्वचषक ही ब्राझीलसाठी त्याची शेवटची स्पर्धा असू शकते. कारण त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार असेल की नाही, हे त्याला सांगता येत नाही. ब्राझीलचा सर्वात मोठा स्टार खेळाडू असल्याने नेमारवरील दबाव आम्ही समजू शकतो, असे ब्राझील फुटबॉल संघातील खेळाडूंनी म्हटले आहे. नेमार सध्या क्लब स्तरावर पॅरिस सेंट जर्मेनकडून खेळतो.

मिडफिल्डर फ्रेड म्हणाला की, ‘त्याने वर्षानुवर्षे आमच्यासोबत राहावे, अशी आमची इच्छा आहे, पण दुसऱ्याच्या मनस्थितीबद्दल आपण बोलणे कठीण आहे. फक्त नेमारच नाही, तर लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो या खेळाडूंनाही प्रचंड दबावाला सामोरे जावे लागते. आम्हाला तो संघात हवा आहे, तो ब्राझीलच्या सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.” नेमारचा जवळचा मित्र डिफेंडर थियागो सिल्वा म्हणाला की, ‘इतर खेळाडूंच्या तुलनेत या स्टार फुटबॉलपटूवर दबाव अवास्तव आहे.’ रविवारी कोलंबियाविरुद्ध गोलशून्य बरोबरीनंतर नेमार शांतपणे मैदानाबाहेर गेला होता.

सहकारी खेळाडूंनी नेमारला दिला पाठिंबा
उरुग्वेविरुद्ध गुरुवारी ब्राझीलच्या विश्वचषक पात्रता सामन्यापूर्वी सिल्वा म्हणाला की, “त्याने मैदानावर काय केले ते आपण विसरतो आणि जे महत्त्वाचे नाही, त्यावर लक्ष केंद्रित करतो. तो स्वतःवर खूप दबाव बनवून ठेवतो. आशा आहे की, तो खेळाचा आनंद घेत राहील.” दुखापतीमुळे खेळू न शकलेले स्ट्रायकर रिचर्लिसनने मनौसमधील चाहत्यांनी हाती घेतलेल्या एका बॅनरचे एक छायाचित्र ट्वीट केले आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, ‘नेमार, जर तू स्वर्गात फुटबॉल खेळशील, तर तुला खेळताना पाहण्यासाठी मी मृत्यूला मिठीत घेईन.’

नेमारची विश्वचषकातील कामगिरी निराशाजनक
या वर्षी जुलैमध्ये ब्राझीलसाठी कोपा अमेरिका विजेतेपद पटकावण्यात नेमार अपयशी ठरला. अंतिम फेरीत अर्जेंटिनाकडून ब्राझीलला पराभव स्वीकारावा लागला. यानंतर क्लबच्या सीझनमध्येही नेमारची सुरुवात चांगली झाली नाही. अलीकडेच त्याने कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात १७ पास चुकवले. तो थकलेला दिसत होता. आतापर्यंत नेमारने दोन विश्वचषक खेळले आहेत आणि त्यात त्यांचा खेळ लक्षात ठेवण्यासारखा नव्हता. २०१४ मध्ये कोलंबियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत तो जखमी झाला होता. त्यानंतर २०१८ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली, उपांत्यपूर्व फेरीत संघ बेल्जियमकडून पराभूत झाला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: