vaccination : करोना लसीचा बूस्टर डोस घ्यावा लागेल का? आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली माहिती


नवी दिल्लीः करोनावरील लसीचे ज्या नागरिकांनी दोन डोस घेत आहेत, त्याना बूस्टर डोस घ्यावा लागेल का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तर दिलं आहे. केंद्र सरकारचा सध्यातरी असा कुठलाही विचार नाहीए. बूस्टर डोससाठी कुठल्याही तज्ज्ञांनी सल्ला दिलेला. यामुळे यावर मुद्द्यावर कुठलीही चर्चा नाहीए, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं. तसंच या महिन्यात करोना लसीचे २८ कोटींहून अधिक डोस उपलब्ध केले जाणार आहेत.

जगातील पहिली डीएनए लस ‘जायकोव्ह-डी’चे ६० लाख डोसही उपलब्ध केले जाणार आहेत, आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं. ही तीन डोस असलेली लस आहे. पहिला डोस दिल्यानंतर दुसरा २८ दिवसांनी आणि तिसरा डोस हा ५६ दिवसांनी दिला जाईल. ऑक्टोबरमध्ये कोविशिल्ड लसीचे २२ कोटी डोस आणि ६ कोटी डोस कोवॅक्सिनचे उपलब्द करून दिले जातील. देशाला सप्टेंबरमध्ये जवळपास लसीचे २६ कोटी डोस मिळाले होते.

देशाला आवश्यक असलेल्या लसींची पूर्तता झाल्यानंतर भारत या वर्षाच्या चौथ्या तीमाहित लसींची व्यावसायिक निर्यात करू शकणार आहे. १८ ते १९ ऑक्टोबरपर्यंत देशात करोना लसीचे १०० कोटी डोस दिले जातील. १०० कोटी डोसचे लक्ष्य पूर्ण झाल्यावर आरोग्य मंत्रालय करोना योद्धे आणि आोग्य कर्मचाऱ्यांसोबत हा क्षण साजरा करण्याची योजना तयार करत आहे, असं सरकारी सूत्रांनी सांगितलं.

Tamil Nadu: कुटुंबात पाच मतदार… पण भाजप पदाधिकाऱ्याला केवळ एकच मत!

दिवाळी आणि छट पूजेसाठी केंद्र सरकारने वेगळ्या कुठल्याही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या नाहीत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्याच्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील. दिवाळी आणि छठसाठी मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केली होती. पण कोविड प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक सूचना आधीपासूनच लागू आहेत. आता नव्या मार्गदर्शक सूचनांची गरज नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं.

india china news : उपराष्ट्रपतींच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनचा आक्षेप, भारताचे खणखणीत प्रत्युत्तरSource link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: