KKR vs DC : कोलकाताने दिल्लीची हवाच काढली, फायनलमध्ये पोहोचण्यासाठी फक्त एक पाऊल दूर…


शारजा : या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची जोरदार हवा होती. पण या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी ही हवाच काढून टाकल्याचे पाहायला मिळाले. कारण केकेआरच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या धावांवर चांगलाच अंकुश ठेवल्याचे पाहायला मिळाले. केकेआरच्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा केला आणि त्यामुळेच दिल्लीला केकेआरपुढे विजयासाठी १३६ धावांचे माफक आव्हान ठेवता आले.

कोलकाताच्या संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि कर्णधार इऑन मॉर्गनने यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॉर्गनचा हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण दिल्लीच्या धडाकेबाज फलंदाजांवर केकेआरच्या गोलंदाजांनी यावेळी अंकुश ठेवल्याचे पाहायला मिळाले. गेल्या सामन्यात पृथ्वी शॉ चांगलाच चमकला होता. पण यावेळी त्याला १८ धावाच करता आल्या. पण वरुण चक्रवर्तीने यावेळी पृथ्वीला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. केकेआरच्या गोलंदाजांनी यावेळी तिखट मारा करत दिल्लीच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारायची संधीच दिली नाही.

दिल्लीच्या धाव होत नसल्याचे पाहून शिखर धवनने खेळपट्टीवर ठाण मांडायचे ठरवले होते. पण स्थिरस्थावर झाल्यावरही धवनला मोठी खेळी साकारता आली नाही. धवनने यावेळी ३९ चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ३६ धावा केल्या. केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने हा केकेआरला दुसरा धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. वरुणने यावेळी दिल्लीच्या पृथ्वी आणि शिखर या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यामुळेच दिल्लीला मोठी धावसंख्या उभारता आली नसल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतही यावेळी अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण पंतला यावेळी फक्त सहा धावांवरच समाधान मानावे लागले. केकेआरचा संघ हा फिरकीपटूंसाठी जास्त ओळखला जातो. पण या सामन्यात लुकी फर्ग्युसन आणि शिवम मावी यांनी सुरुवातीला भेदक गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच दिल्लीच्या संघाला मोठी फटकेबाजी करता आली नाही. त्यामुळे केकेआरच्या गोलंदाजांनी आपली भूमिका चोख निभावली आहे, त्यामुळे आता त्यांचे फलंदाज संघाला फायनलमध्ये पोहोचवणार का, याची उत्सुकता सर्वांना असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: