धक्कादायक! तब्बल ५० लाख रुपयांची लाच घेताना नगरसेवकाला अटक


हायलाइट्स:

  • अर्ज मागे घेण्यासाठी दुकानदाराकडून ५० लाखांची लाच
  • स्वीकृत नगरसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले
  • भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : अनधिकृत दुकाने तोडण्याबाबत महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेण्यासाठी दुकानदाराकडून ५० लाखांची लाच घेताना भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकाला बुधवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. सिद्धेश्वर कामुर्ती (वय ६२) असं अटक करण्यात आलेल्या लाचखोर नगरसेवकाचं नाव आहे.

नगरसेवकाच्या लाखो रुपायांच्या या लाचखोरीमुळे महापालिका आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कामुर्ती हे कॉंग्रेसचे स्वीकृत नगरसेवक आहेत.

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले; जुन्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला

भिवंडीतील पद्मानगर भाजी मार्केट येथे तक्रारदार यांचे दुकान असून त्याठिकाणी सुमारे १०० दुकाने आहेत. अनधिकृत असलेली ही दुकाने तोडण्याबाबत स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती यांनी महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी कामुर्ती यांनी प्रत्येक दुकानामागे २ लाखाप्रमाणे एकूण तब्बल दोन कोटींची लाच मागितली. मात्र, तक्रारदाराने पैसे देण्यास नकार देत या लाचेबाबत ३० सप्टेंबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) लेखी तक्रार केली.

या तक्रारीनंतर एसीबीने ४ ऑक्टोबर रोजी केलेल्या पडताळणीमध्ये कामुर्ती यांनी तडजोडीअंती तक्रारदाराकडे ५० लाखांची लाच मागितल्याचं स्पष्ट झालं. त्यांनतर बुधवारी एसीबीने भिवंडीमध्येच सापळा लावून तक्रारदाराकडून ५० लाखांची लाच घेताना कामुर्ती यांना रंगेहात पकडलं. नगरसेवक कामुर्ती यांना अटक करण्यात आल्याची माहिती एसीबीच्या ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिली. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: