पंढरपूर नगरपरिषदच्या सहकार्यातून 50 ऑक्सिजन बेड असलेले विठ्ठल रुक्मिणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे उद्घाटन

पंढरपूर – पंढरपूर नगर परिषदेच्या सहकार्यातुन 65 एकर भक्ती सागर येथे डॉ अमित गुंडेवार व डॉ पंकज गायकवाड यांच्या विठ्ठल रुक्मिणी डी.सी.एच.सी. कोव्हीड हेल्थ सेंटरचे उद्घाटन आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले,उपनगराध्यक्षा सौ श्वेता डोंबे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,प्रांताधिकारी सचिन ढोले,पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,पक्ष नेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, तहसीलदार सुशील बेल्हेकर , उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले, आरोग्य समितीचे सभापती विक्रम शिरसट, नगरसेवक शकुंतला नडगिरे ,संजय निंबाळकर जगदीश जोजारे, विवेक परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .

    यावेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले की, गेल्या वर्षी पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून सुमारे 55 लाख रुपये खर्च करून हे कोविड केअर सेंटर उभा करण्यात आले होते. गेल्या वर्षभरामध्ये या कोविड केअर सेंटरचा रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी चांगला उपयोग झाला होता परंतु सद्य परिस्थिती मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहर व तालुक्यातील नागरिकांची ऑक्सीजन बेडची कमतरता लक्षात घेऊन याठिकाणी ५०ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासंबंधीचा निर्णय नगर परिषदने घेतला होता त्यास अनुसरून डॉ पंकज गायकवाड व डॉ अमित गुंडेवार यांनी पुढाकार घेत हे 50 ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल उभा केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.आणखीन गरज पडली तर 50 बेडचे ऑक्सिजन रुग्णालय उभा करण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.लवकरच पांडुरंग व युटोपीयन कारखान्याच्यावतीने सुद्धा ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता लक्षात घेता ऑक्सिजनची निर्मिती करून लवकरात लवकर ऑक्‍सिजन उपलब्ध करून दिला जाईल त्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आल्याचे सांगितले.

     नूतन आमदार समाधान आवताडे यांनी या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा मिळावी व या हॉस्पिटलमुळे पंढरपूर परिसरातील कोरोना रुग्णांना माफक दरात उपचाराचा मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले व आमदार म्हणून कोणतीही अडचण आल्यास निश्चितपणे मदत करेन असे आश्वासन दिले.

   या कार्यक्रमास मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ गिराम,माजी नगरसेवक निलराज डोंबे सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके ,भैया देशमुख ,नरेंद्र डांगे डॉ मिलिंद देशपांडे आदी उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे स्वागत डॉ अमित गुंडेवार यांनी केले.आभार प्रदर्शन पक्षनेते अनिल अभंगराव यांनी केले. सूत्रसंचलन उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी केले.

गरज पडल्यास 50 बेडचे अजून एक अद्यावत कोविड सेंटर उभा करणार -आमदार प्रशांत परिचारक If needed, another state-of-the-art Covid Center with 50 beds will be set up – MLA Prashant Paricharak

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *