स्टॉकहोम: नॉर्वेची राजधानी ओस्लोजवळ एका व्यक्तीने धनुष्य-बाणाने हल्ला केला. या हल्ल्यात पाच जण ठार झाले आहेत. तर, काही जण जखमी झाले आहेत. या प्रकरणात संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्याचा उद्देश्य अद्याप स्पष्ट झाला नाही.
कोंग्सबर्ग शहराचे पोलीस प्रमुख ओएविंड आस यांनी बुधवारी माध्यमांना सांगितले की, या हल्ल्यासाठी धनुष्य बाणाचा वापर करण्यात आला. त्याशिवाय इतर कोणत्या शस्त्राचा वापर करण्यात आला का, याचीही चौकशी करण्यात येत आहे. हा हल्ला एकाच व्यक्तीने केला. हल्लेखोरास अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले.
‘या’ देशात करोना महासाथीचे तांडव; एकाच दिवसात ९०० हून बळी
या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाला असल्याचे वृत्त आहे. आरोपीचे नाव डॅनिश असल्याचे समजते. तो स्थानिक नागरिक आहे. हल्लेखोर डॅनिशवर याआधी कोणतेच आरोप नव्हते. हल्ल्याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोराला घेरून पोलिसांनी त्याला अटक केली. या दरम्यान आरोपीने पोलिसांवरही हल्ला केला.
बलात्कार, हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात काढली ३७ वर्षे; डीएनए चाचणीमुळे ठरला निर्दोष!
घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये एक बाण भिंतीत रुतला असल्याचे दिसून आले. ही घटना कोंग्सबर्ग शहरात घडली. हे शहर राजधानी ओस्लोपासून ६८ किमी दूर अंतरावर आहे.
Source link
Like this:
Like Loading...