आनंदराव अडसूळ यांच्यावर ED चौकशीची टांगती तलवार कायम; कोर्टानं फेटाळली याचिका


हायलाइट्स:

  • आनंदराव अडसूळ यांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का
  • ईडी चौकशीविरोधातील याचिका फेटाळली
  • अटकपूर्व जामिनासाठी सेशन कोर्टात जाण्याची सूचना

मुंबई: शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांना दुसरा धक्का बसला आहे. सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात ईडीनं सुरू केलेल्या चौकशीविरोधात अडसूळ यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळं आता अडसूळ यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. (Bombay High Court Rejects Anandrao Adsul Plea against ED Inquiry)

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीनं अडसूळ यांच्या मुंबई व अमरावती येथील घरी छापे टाकले होते. तसंच, चौकशीसाठी ईडीनं अडसूळ यांना समन्स बजावलं होतं. मात्र, तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. दरम्यानच्या काळात अडसूळ यांनी ईडीच्या चौकशीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. ईडीनं पाठवलेलं समन्स रद्द केलं जावं, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. मात्र, ही अडसूळ यांची विनंती कोर्टानं फेटाळली. तसंच, मुंबई सेशन्स कोर्टात रीतसर अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याची सूचना अडसूळ यांना केली.

काय आहे नेमकं प्रकरण?

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष असलेल्या आनंदराव अडसूळ यांनी हजारो खातेधारकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बँकेच्या खातेदारांमध्ये गिरणी कामगार, डबेवाले, सर्वसामान्य लोक, निवृत्ती वेतनधारकांचा यांचा समावेश आहे. यातील ९० टक्के खातेदार मराठी आहेत. अडसूळ यांनी २० टक्के कमिशन घेऊन बिल्डरांना नियमबाह्य कर्ज दिलं. त्यामुळं बँक बुडाली असून यात जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात सध्या अडसूळ यांना ईडीनं समन्स बजावलं आहे.

हेही वाचा:

LIVE आर्यन खान नियमित ड्रग्ज घेत असल्याचं प्रथमदर्शनी पुराव्यातून दिसतं – NCB

नवाब मलिक यांनी जाहीर केलेला ‘तो’ मोबाइल नंबर कोणाचा? चर्चेला उधाण

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ‘शूर्पणखा’ नको; चित्रा वाघ यांचा चाकणकरांना टोलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: