राष्ट्रीय पेन्शन योजना आकर्षक; केंद्र सरकारने हे केले महत्वाचे बदल
नवीन नियमानुसार यापुढे राष्ट्रीय पेन्शन योजनेत व वर्ष ७० पर्यंतची व्यक्ती सहभागी होऊ शकते. सध्याची वयोमर्यादा ६५ असून त्यात नव्या नियमानुसार पाच वर्षांची वाढ करण्यात आली आहे. १८ ते ७० वयोमर्यादतील व्यक्ती एनपीएससाठी पात्र आहे, असं पीएफआरडीएने म्हटलं आहे.
शेअर बाजारात दिवाळी; सेन्सेक्स पहिल्यांदाच ६१००० अंकावर, गुंतवणूकदारांची कमाई
आकस्मित पैशांची गरज भासल्यास सभासदाला ती मुभा देण्यात आली आहे. जर ग्राहकाला एनपीएसमधून तातडीने पैसे काढायचे असतील आणि त्याचा एनपीएस खात्यातील शिल्लक निधी २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असून त्यानुसार त्याला अटी आणि शर्थींनुसार अंशतः पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. थोडक्यात एनपीएसमधून पैसे काढण्याबाबतची नियमावली शिथिल करण्यात आली आहे.
तुमच्याकडे आहे का ‘हा’ क्रिप्टो कॉईन; अवघ्या दोन महिन्यात एक हजारचे झाले ३४ लाख!
पीएफआरडीए एनपीएस योजनेतून बाहेर पडण्यासाठी ऑनलाइन आणि पेपरलेस प्रक्रिया सुरु केली आहे. यापूर्वी, केवळ बिगर सरकारी क्षेत्रातील ग्राहकांना ही ऑनलान एक्झिटची सुविधा देण्यात येत होती. आता सर्वच सभासदांना बँक खाते पडताळणीनंतर एनपीएसमधून बाहेर पडण्यास परवानगी दिली जाणार आहे.
देशात कोळसा संकट; मुकेश अंबानींचा मोठा डाव,३ दिवसांत ४ विदेशी कंपन्यांवर मिळवला ताबा
आणखी एक महत्वाचा बदल सरकारने या योजनेत केला आहे. त्यानुसार ६५ वर्षांनंतर एनपीएस गुंतवणूक करणाऱ्यांना तीन वर्षांचा किमान गुंतवणूक कालावधी (लॉकइन) आहे. योजनेतून बाहेर पडण्यासाठी कमाल ७५ वर्ष वय आवश्यक आहे. ग्राहक एकूण रकमेपैकी ६० टक्के रक्कम करमुक्त एकरकमी म्हणून काढू शकतात आणि उर्वरित ४० टक्के रक्कम एन्युइटी खरेदी करण्यासाठी वापरावी लागेल.
नुकताच पीएफआरडीएने अॅसेट अॅलोकेशनच्या नियमांत बदल केला होता. त्यानुसार ६५ वर्षांच्या वयानंतर एनपीएसमध्ये सामील होणाऱ्या सभासदांना इक्विटीमध्ये ५० टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे. जर गुंतवणूकदारांनी हा पर्याय निवडला नाही तर १५ टक्के शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते.