पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांना कोरोना मोफत लसिकरण

पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांना कोरोना मोफत लसिकरण
पंढरपूर, 14/10/2021 - पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांना कोरोनाची मोफत लस देण्यासाठी आपटे उपलप प्रशालेत लसीकरण शिबिराचे आयोजन या प्रभागाचे नगरसेवक अनिल अभंगराव व सुप्रिया डांगे यांनी केले होते.

या लसीकरण केंद्राचे उदघाटन आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते स्व.माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसेवक हरिभाऊ डांगे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, प्रभाग क्र 5 चे नगरसेवक अनिल अभंगराव, श्रीमती सुप्रियाताई डांगे, आरोग्य समिती सभापती विक्रम शिरसट, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, अर्बन बँकेचे संचालक हरिष ताठे, आपटे उपलप प्रशालेचे सचिव बी.जे.डांगे, मुख्याध्यापक जयंत हरिदास, राजगोपाळ भट्टड,श्रीकांत हरिदास, दिलीप शहा, सतिश सुपेकर तसेच आपटे उपलप प्रशालेचे शिक्षक वर्ग व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: