राज्यस्तरीय बेंचप्रेस पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ऐश्वर्या दुधाळला सुवर्ण पदक

राज्यस्तरीय बेंचप्रेस पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ऐश्वर्या दुधाळला सुवर्ण पदक
भरणे, ता खेड जि रत्नागिरी - औरंगाबाद जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने दि .०९ ते १० ओक्टोंबर रोजी राज्यस्तरीय बेंचप्रेस सबज्युनिअर महिला ६९ किलो वजनी गटात ऐश्वर्या दुधाळ रा.भरणे, ता.खेड जि. रत्नागिरी  हिने सुवर्ण पदक पटकावले असून या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून एकूण ४०० खेळाडू सहभागी झाले होते. 

ऐश्वर्या दुधाळ हिला प्रशिक्षक राज नेवरेकर तसेच मार्गदर्शक मदन भास्करे ,निशीला महाडिक सहकारी प्रथमेश पवसकर कुणाल चव्हाण संकेत फागे व कालकाई जीमचे संचालक भारत मोहन घोले यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

  ऐश्वर्या दुधाळ ही मुळची सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील सोनके गावची सुकन्या असून तिचे वडील हे भरणे,ता.खेड जि. रत्नागिरी येथे प्राध्यापक आहेत. 

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: