नवी दिल्ली : पाकिस्तानच्या संघात आता मोठा भूकंप आलेला आहे. कारण विश्वचषकाला काही दिवस शिल्लक असताना त्यांचा खेळाडू फिक्सिंगच्या आरोपांखाली दोषी आढळला आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आता याबाबतची माहिती दिली आहे. पीसीबीने सांगितले की, जीशान मलिकला फिक्सिंगच्या आरोपांखाली दोषी आढळला आहे आणि त्यामुळे त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. फिक्सिंगच्याबाबत कोणतीही माहिती जीशानने पीसीबीला दिली नव्हती. या प्रकरणात आता जीशान दोषी आढळल्याचे पाहायला मिळाले आहे. यापूर्वी पाकिस्तानचा उपर अकमलवरही असेच फिक्सिंगचे आरोप ठेवण्यात आले होते आणि त्यामध्ये तो दोषी आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर तीन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती, पण त्यानंतर त्याची शिक्षा कमी करत १८ महिने एवढी करण्यात आली होती. त्यानंतर उमरने पाकिस्तानच्या संघात पुनरागमनही केले होते. जीशान आणि उमर यांचे प्रकरण सारखेच आहे. कारण जीशानने नॅशनल टी-२० चषकाच्या सामन्यातील फिक्सिंगची माहिती पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाला दिली नव्हती. जीशान हा पाकिस्तानकडून २०१६ साली १९-वर्षांखालील विश्वचषकात खेळला होता. या विश्वचषकात जीशानने ५६च्या सरासरीने २२५ धावा केल्या होत्या. त्यावेळी जीशानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे जीशान हा पाकिस्तानचे उज्वल भविष्य आहे, असेही म्हटले गेले होते. पण जीशान हा आता फिक्सिंगच्या आरोपांखाली दोषी आढळला आहे. त्यामुळे आता किमान तीन वर्षे तरी तो खेळू शकणार नाही. या सर्व प्रकरणामुळे पाकिस्तानच्या क्रिकेटमधील फिक्सिंगची कीड अजूनही संपलेली नसल्याचेच पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान हे माजी विश्वविजेते कर्णधार आहेत, तर पीसीबीचे अध्यक्षही माजी क्रिकेटपटू आहेत. पण तरीही पाकिस्तानचे क्रिकेट मात्र अद्याप सुधारलेले दिसत नाही. कारण गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानमध्ये हे प्रकार सातत्याने घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता रमीझ राजा पीसीबीचे अध्यक्ष झाल्यावर या सर्व गोष्टींना कसा आळा घालतात, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले असेल.
Source link
Like this:
Like Loading...